शेलगाव बाजार ग्रामपंचायत प्रत्येक कुटुंबाला करून देणार १०० किलो डाळ 

गावातून विविध करांपोटी मिळणारा महसूल नियोजन करीत ग्राम विकासासाठी वापरून ग्रामस्थांचे जीवनमान उंचाविण्याचा एक अभिनव पॅटर्न शेलगाव बाजारच्या लोकनियुक्त सरपंच सरलाताई अमित खर्चे यांनी हातात घेतला आहे.
pulses process
pulses process

बुलडाणा ः गावातून विविध करांपोटी मिळणारा महसूल नियोजन करीत ग्राम विकासासाठी वापरून ग्रामस्थांचे जीवनमान उंचाविण्याचा एक अभिनव पॅटर्न शेलगाव बाजारच्या लोकनियुक्त सरपंच सरलाताई अमित खर्चे यांनी हातात घेतला आहे. गावातील जे कुटुंब ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर १५ मार्च २०२१ पर्यंत भरेल अशा कुटुंबाला १०० किलो डाळ मोफत तयार करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

या उपक्रमाचे शेलगाव बाजार येथील जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामसंसद कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‍घाटनही करण्यात आले आहे. 

शेलगाव बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या मालमत्ताधारकाने चालू २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ग्रामपंचायतीचा सर्व कर भरणा केलेला असेल किंवा ज्यांचा कर भरणा राहिलेला असेल त्यांनी १५ मार्चपर्यंत आपला कर भरणा करावा. असा कर भरणा केलेल्या सर्वांना ३१ मार्चपर्यंत प्रति कुटुंब १०० किलो डाळ मोफत तयार करून दिली जाईल. डाळी बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वनिधीतून स्वत:ची गिरणी सुरू केली आहे. 

या गिरणीचे शुक्रवारी (ता.२६) जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गवई, सरपंच सरलाताई अमित खर्चे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन पॅड मशिनसुद्धा ग्रामपंचायतीसमोर वाचनालयाजवळ लावण्यात आली आहे. सोबतच पॅड डिस्पोजल मशिनही बसविण्यात आली. याचे उद्‍घाटन पंचायत समिती सदस्या उज्ज्वलाताई पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उपसरपंच योगेश खंडारे, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. माडीवाले, डॉ. अमित खर्चे, संदीप खर्चे, गणेश वाघ, पुरुषोत्तम पाटील, मंगेश खर्चे यांच्यासह इतर उपस्थित होते.  प्रतिक्रिया  गावकऱ्यांकडून वसूल होणाऱ्या करातून ग्रामविकासाची कामे केली जातात. यासाठी वसुली पूर्ण व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी १०० किलो डाळ तयार करून देण्यासारखे अभिनव उपक्रम ग्रामपंचायत राबवीत आहे.  - सरलाताई खर्चे, सरपंच   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com