agriculture news in Marathi shelgaon bajar grampanchayat will give 100 kg pulses process Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेलगाव बाजार ग्रामपंचायत प्रत्येक कुटुंबाला करून देणार १०० किलो डाळ 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

गावातून विविध करांपोटी मिळणारा महसूल नियोजन करीत ग्राम विकासासाठी वापरून ग्रामस्थांचे जीवनमान उंचाविण्याचा एक अभिनव पॅटर्न शेलगाव बाजारच्या लोकनियुक्त सरपंच सरलाताई अमित खर्चे यांनी हातात घेतला आहे. 

बुलडाणा ः गावातून विविध करांपोटी मिळणारा महसूल नियोजन करीत ग्राम विकासासाठी वापरून ग्रामस्थांचे जीवनमान उंचाविण्याचा एक अभिनव पॅटर्न शेलगाव बाजारच्या लोकनियुक्त सरपंच सरलाताई अमित खर्चे यांनी हातात घेतला आहे. गावातील जे कुटुंब ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर १५ मार्च २०२१ पर्यंत भरेल अशा कुटुंबाला १०० किलो डाळ मोफत तयार करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

या उपक्रमाचे शेलगाव बाजार येथील जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामसंसद कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‍घाटनही करण्यात आले आहे. 

शेलगाव बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या मालमत्ताधारकाने चालू २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ग्रामपंचायतीचा सर्व कर भरणा केलेला असेल किंवा ज्यांचा कर भरणा राहिलेला असेल त्यांनी १५ मार्चपर्यंत आपला कर भरणा करावा. असा कर भरणा केलेल्या सर्वांना ३१ मार्चपर्यंत प्रति कुटुंब १०० किलो डाळ मोफत तयार करून दिली जाईल. डाळी बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वनिधीतून स्वत:ची गिरणी सुरू केली आहे. 

या गिरणीचे शुक्रवारी (ता.२६) जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गवई, सरपंच सरलाताई अमित खर्चे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन पॅड मशिनसुद्धा ग्रामपंचायतीसमोर वाचनालयाजवळ लावण्यात आली आहे. सोबतच पॅड डिस्पोजल मशिनही बसविण्यात आली. याचे उद्‍घाटन पंचायत समिती सदस्या उज्ज्वलाताई पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उपसरपंच योगेश खंडारे, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. माडीवाले, डॉ. अमित खर्चे, संदीप खर्चे, गणेश वाघ, पुरुषोत्तम पाटील, मंगेश खर्चे यांच्यासह इतर उपस्थित होते. 

प्रतिक्रिया 
गावकऱ्यांकडून वसूल होणाऱ्या करातून ग्रामविकासाची कामे केली जातात. यासाठी वसुली पूर्ण व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी १०० किलो डाळ तयार करून देण्यासारखे अभिनव उपक्रम ग्रामपंचायत राबवीत आहे. 
- सरलाताई खर्चे, सरपंच 
 


इतर अॅग्रो विशेष
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...