शेळगाव, वरखेड लोंढे बॅरेजचे काम वर्षभरात करणार ः गिरीश महाजन

शेळगाव, वरखेड लोंढे बॅरेजचे काम वर्षभरात करणार ः गिरीश महाजन
शेळगाव, वरखेड लोंढे बॅरेजचे काम वर्षभरात करणार ः गिरीश महाजन

जळगाव : जिल्ह्यातील शेळगाव, वरखेड लोंढे बॅरेजचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. तसेच पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात येईल, तर महापालिकेचे गाळे व हुडको कर्ज प्रकरण आचारसंहितेपूर्वीच मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, की शेळगाव व वरखेड लोंढेचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. तसेच पाडळसरे धरणाचे कामही पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी मोठा निधीही उपलब्ध करण्यात येईल. तसेच नारपार, दमणगंगा या पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी जिल्ह्यातील काही नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वळविण्यात येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येईल. 

जळगाव महापालिका लवकरच हुडकोच्या कर्जातून मुक्त करण्यात येईल. महापालिकेच्या ४६७ कोटींपैकी आता केवळ २६७ कोटी रुपयेच फेडायचे आहेत. त्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ही रक्‍कम देण्याची मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शविली असून लवकरच महापालिका कर्जमुक्त होईल, असे महाजन यांनी सांगितले. महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे प्रश्‍नाबाबत ते म्हणाले की, गाळेधारकांची याबाबत बोलणी अंतिम टप्प्यात आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून चार दिवसांत मार्ग काढण्यात येईल. 

जळगाव शहरात विकासाची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जामनेर येथेही काही महिन्यांपूर्वी अशीच परिस्थिती होती. मात्र त्या ठिकाणी आता सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आज त्या ठिकाणी नागरिकांना रस्ते तसेच इतर सुविधाही मिळाल्या आहे. जळगावातीलही ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील व जळगावचा चेहरा मोहरा बदलून दाखवू, असे महाजन यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com