agriculture news in Marathi, Shepherd in problem in drought, Maharashtra | Agrowon

दुष्काळाने शेळ्या-मेंढ्यांची उपासमार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

सांगली : दुष्काळी भागातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत चालल्याने वाडवडिलार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून, चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. त्यामुळे सततच्या दुष्काळाने मेंढपाळ खचत चालला आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आहे. 

सांगली : दुष्काळी भागातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत चालल्याने वाडवडिलार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून, चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. त्यामुळे सततच्या दुष्काळाने मेंढपाळ खचत चालला आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आहे. 

जत तालुक्‍यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात सुमारे ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या मेंढ्या आहेत. मेंढीपालन हा व्यवसाय आहे. मोकळे रान अधिक असल्याने मेंढपाळांना पावसाळ्यात चाऱ्याची अजिबात कमतरता पडत नसे. 

इतर वेळीही चारा उपलब्ध होत असे, मात्र अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत चालल्याने चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत म्हणावा असा पाऊस झाला नाही, त्यामुळे रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागले नाही. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालणारा हा व्यवसाय हळूहळू कमी होत आहे.  चारा-पाणी यांचा बिकट प्रश्‍न होत चालल्याने मेंढपाळांचे जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे.

गेल्या जूनपासून मोकळ्या रानात चारा उपलब्ध नाही. डोंगरमाथ्यावरील खुरटे गवत सुकून गेले आहे. पाणी नसल्याने झाडेझुडपे सुकून गेली आहेत. झुडपांची पानेसुद्धा वाळून गेली आहेत. झाडाझुडपांवर फक्त वाळलेल्या काटक्‍याच शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे दिवसभर मेंढरं कुठं फिरवून आणायची, असा प्रश्‍न मेंढपाळांपुढे पडला आहे. चारा विकत घेऊन जनावरांना घालायचा आर्थिकदृष्‍ट्या परवडत नाही. 

सध्या मेंढ्या विकून प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मेंढ्यांच्या कळपातल्या मेंढ्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यातच गावात, परिसरात काम नाही. त्यामुळे मेंढ्या विकून आणखी किती दिवस जगायचे असा मोठा प्रश्‍न मेंढपाळांना पडला आहे. मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करतील का, असाही सवाल व्यक्त होत आहे. 

शेळ्या-मेंढ्यांची तालुकानिहाय संख्या

तालुका  संख्या
खानापूर ८४,२०३
तासगाव  १,३२,८७७
जत    २,१३,१४२
कवठेमहांकाळ  १,०७,६५९
आटपाडी   ९३९१७

   
    
  

  
 
 

इतर बातम्या
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...