शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे १० पासून अधिवेशन

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे १० पासून अधिवेशन
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे १० पासून अधिवेशन

शिरूर, जि. पुणे ः शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे तीन दिवसीय, १४ वे संयुक्त अधिवेशन १० डिसेंबरपासून शिर्डी येथे सुरू होत आहे. आगामी निवडणुका कृषी धोरणावर व्हाव्यात, या मुद्द्यावर अधिवेशनात जोर दिला जाणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गद्रे यांनी दिली. शिर्डीतील प्रसादालयाशेजारील मैदानावर १० ते १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या या अधिवेशनास देशभरातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.  अधिवेशनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार सरोज काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, किसान समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी खासदार भूपेंद्र सिंह मान, भारतीय किसान युनियनचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष ठाकूर गुणी प्रकाश आदी मार्गदर्शन करणार आहेत.   शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांचा ऊहापोह या अधिवेशनात होणार आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी नाइलाजास्तव आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. मात्र, सरकारच्या स्तरावर त्याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नाही. यावर विचारविनिमय करून आगामी काळातील आंदोलनाची रणनीती या अधिवेशनात ठरवली जाणार असल्याचे गद्रे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com