नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
पीकविमा प्रकरणी न्यायालयीन लढा उभारण्याचा संघटनेचा संकल्प
नांदेड : पीकविमा प्रकरणी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्क आणि न्यायालयीन लढाईची तयारी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
नांदेड : पीकविमा प्रकरणी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक नुकतीच (ता. २९) आनंदनगर, नांदेड येथे घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्क आणि न्यायालयीन लढाईची तयारी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात पीकविम्याचा प्रश्न गंभीर विषय बनला आहे. याबाबत जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक रविवारी घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. धोंडीबा पवार, गोविंद मुंडकर, दिगंबर शिंदे, प्रा. शिवाजी मोरे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होऊन प्रारंभी विमा कंपनी, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा करण्यात यावी. त्यानंतर शासन दरबारी शिष्टमंडळ नेण्याचे प्रयत्न करण्याचे ठरले आहे. त्यानंतर अंततः: न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पीकविमा प्रकरणी लढाईचे स्वरूप ठरविण्यासाठी मंगळवारी (ता. एक डिसेंबर) दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे शिवाजी शिंदे, ॲड. धोंडीबा पवार यांनी कळविले आहे. प्रत्येक तालुक्यात शेतकरी स्वयंस्फूर्तीने पीकविम्याबाबत संघर्ष करत आहेत.
याविषयी सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीने लढा देण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे. या बैठकीस विमा पीडित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.