दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणार
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन जिल्हाभर उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिली.
नांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा मिळविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार, तसेच पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या भेटी घेण्यात येणार आहेत. शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता. १२) पीकविमा सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन जिल्हाभर उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मंगळवारी (ता. १) शेतकरी संघटना व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळणे न्याय्य व वास्तव आहे. परंतु खासगी विमा कंपनीने तो नाकारला आहे. याबाबत प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर, ॲड. धोंडिबा पवार, शिवाजी शिंदे, गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांनी शेतकऱ्यांना सर्व कायदेविषयक व तांत्रिक बाबी उलगडून शेतकऱ्यांवर खासगी विमा कंपनीने विमा नाकारून अन्याय केला असे सांगितले.
नवा मोंढा येथे झालेल्या बैठकीत नांदेड जिल्ह्यातल्या १६ तालुक्यांतून कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या भागात झालेल्या पीकनुकसानीचे वास्तव सांगितले. विमा कंपनीकडून नुकसानभरपाई नाकारली असे त्यांनी सांगितले. वैयक्तिक दावे करणाऱ्यांना अत्यल्प विमा नुकसानभरपाई दिली, हे यावरून स्पष्ट होते.
विमा कंपनीकडे असणारा अपुरा कर्मचारीवर्ग व अतांत्रिक कर्मचारी यामुळे मोठे नुकसान झाले. तसेच जिल्हा पीकविमा समितीने विमा मिळविण्यासाठी कसे दुर्लक्ष केले, हे उदाहरणासह प्रा. शिवाजी मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच ॲड. पवार व शिवाजी शिंदे यांनी शरद जोशी यांना अभिवादन करण्यासाठी व पुढील महाजनआंदोलन करण्यासाठी १२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात यावे, असे आवाहन केले.
या वेळी किशनराव पाटील येळेकर, आर. पी. कदम, व्यंकटराव पाटील वडजे, तुकारामजी मोरे, दत्तराम पाटील, दिगंबरराव शिंदे, प्रा. उत्तमराव भोपाळकर, कोळीकर आदी सोळा तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.
- 1 of 1023
- ››