शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध : बहाळे

शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व बेड्या तोडून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध असल्याचे मत संघटनेचे नूतन अध्यक्ष ललीत बहाळे यांनी व्यक्त केले.
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध : बहाळे
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध : बहाळे

अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व बेड्या तोडून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध असल्याचे मत संघटनेचे नूतन अध्यक्ष ललीत बहाळे यांनी व्यक्त केले. अकोट (जि. अकोला) येथे शेतकरी संघटनेच्या तीनदिवसीय संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. शेतकरी संघटनेची तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणी अकोट येथील सातपुडा मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यभरातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यात शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी ललीत बहाळे यांची नियुक्ती करण्यात आली.  माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, अॅड. दिनेश शर्मा, अनिल घनवट यांनी कार्यकारिणीस मार्गदर्शन केले. महिलांना मालमत्तेत सहभागी करून घेण्यासाठी लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचे बहाळे यांनी सांगितले. या बैठकीस माजी अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, मधुसूदन हरणे, अनंतराव देशपांडे, संजय कोले, सतीश दाणी, सीमाताई नरोडे, शैलजाताई देशपांडे, ज्योत्स्नाताई बहाळे, मदन कामाडे, वामनराव जाधव, शशिकांत भदाणे, रामजीवन बोंदर, अनिल चव्हाण, डॉ. अप्पासाहेब कदम, समाधान कणखर, सुरेश जोगळे, सतीश देशमुख, अविनाश नाकट, लक्ष्मीकांत कौटकर, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, डॉ. नीलेश पाटील यांच्यासह राज्यभरातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन सतीश देशमुख यांनी केले. तर शेतकरी संघटनेची शपथ घेऊन कार्यकारिणीचा समारोप करण्यात आला.

‘दिल्लीतील आंदोलन आत्मघातकी’ नूतन अध्यक्ष श्री. बहाळे यांनी सध्या दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांसाठी आत्मघातकी आंदोलन आहे. सरकारने केलेले कायदे हे शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल आहे. या सर्व कायद्यांचा अभ्यास करून हे कायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी संघटना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. 

नूतन कार्यकारिणी अशी... अध्यक्ष ः ललीत बहाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी प्रज्ञाताई बापट, युवा आघाडीच्या अध्यक्षपदी सुधीर बिंदू, स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मधुसूदन हरणे यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी कार्यकारी मंडळाने नवीन पदाधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेचा झेंडा देऊन पदभार हस्तांतरित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com