agriculture news in marathi Shetkari Sanghatana committed to the complete independence of farmers says Newly elected President | Page 4 ||| Agrowon

शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध : बहाळे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व बेड्या तोडून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध असल्याचे मत संघटनेचे नूतन अध्यक्ष ललीत बहाळे यांनी व्यक्त केले.

अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व बेड्या तोडून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध असल्याचे मत संघटनेचे नूतन अध्यक्ष ललीत बहाळे यांनी व्यक्त केले.

अकोट (जि. अकोला) येथे शेतकरी संघटनेच्या तीनदिवसीय संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. शेतकरी संघटनेची तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणी अकोट येथील सातपुडा मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यभरातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यात शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी ललीत बहाळे यांची नियुक्ती करण्यात आली. 

माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, अॅड. दिनेश शर्मा, अनिल घनवट यांनी कार्यकारिणीस मार्गदर्शन केले. महिलांना मालमत्तेत सहभागी करून घेण्यासाठी लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचे बहाळे यांनी सांगितले.

या बैठकीस माजी अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, मधुसूदन हरणे, अनंतराव देशपांडे, संजय कोले, सतीश दाणी, सीमाताई नरोडे, शैलजाताई देशपांडे, ज्योत्स्नाताई बहाळे, मदन कामाडे, वामनराव जाधव, शशिकांत भदाणे, रामजीवन बोंदर, अनिल चव्हाण, डॉ. अप्पासाहेब कदम, समाधान कणखर, सुरेश जोगळे, सतीश देशमुख, अविनाश नाकट, लक्ष्मीकांत कौटकर, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, डॉ. नीलेश पाटील यांच्यासह राज्यभरातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन सतीश देशमुख यांनी केले. तर शेतकरी संघटनेची शपथ घेऊन कार्यकारिणीचा समारोप करण्यात आला.

‘दिल्लीतील आंदोलन आत्मघातकी’
नूतन अध्यक्ष श्री. बहाळे यांनी सध्या दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांसाठी आत्मघातकी आंदोलन आहे. सरकारने केलेले कायदे हे शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल आहे. या सर्व कायद्यांचा अभ्यास करून हे कायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी संघटना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. 

नूतन कार्यकारिणी अशी...
अध्यक्ष ः ललीत बहाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी प्रज्ञाताई बापट, युवा आघाडीच्या अध्यक्षपदी सुधीर बिंदू, स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मधुसूदन हरणे यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी कार्यकारी मंडळाने नवीन पदाधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेचा झेंडा देऊन पदभार हस्तांतरित केला.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांना...नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘बळिराजा’च्या...सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या...
सरकारने कोंबड्या जगविण्यासाठी शेतकरी...यवतमाळ : केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य...
अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे......सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही...
विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचणी नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले,...
जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडीचा खडसेंचा...जळगाव ः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या...जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा...
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवरसोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६...
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला...सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या...
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने...नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना...
अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसेअकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा...
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी...
रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत...रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार...
देगलूर-बिलोलीची निवडणूक ‘महाविकास’च्या...नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत...
ऊसबिलातून वीजबिल कपातीच्या आदेशाची...नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी...
सोलापूर जिल्ह्यातील २४ कारखान्यांना...माळीनगर, जि. सोलापूर  : जिल्ह्यातील २४ साखर...
‘सांबरकुड’चा सुधारित आराखडारायगड : गेल्या ३७ वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या...
कार्तिक वारी नियोजनाबाबत...सोलापूर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच...