agriculture news in marathi, Shetkari Sanghatana will agitate on farmers issues | Agrowon

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

शेगाव, जि. बुलडाणा : सध्या देशातील सरकारची धोरणे ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अाहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मंगळवारी (ता. १२) शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त आयोजित शेतकरी स्वातंत्र्य मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

शेगाव, जि. बुलडाणा : सध्या देशातील सरकारची धोरणे ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अाहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मंगळवारी (ता. १२) शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त आयोजित शेतकरी स्वातंत्र्य मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

शेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केट यार्डाच्या मैदानावर झालेल्या या मेळाव्याला अॅड. वामनराव चटप, सरोज काशीकर, माजी आमदार गुणवंत पाटील, एकनाथ पाटील, महेंद्र कचोले, गंगाधर मुटे यांच्यासह इतर उपस्थित होते. या वेळी ॲड. चटप म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही. तो संकटात आहे. सध्या सातत्याने नैसर्गिक फटका बसतो अाहे. पण शेतकऱ्याला कुठलीही ठोस मदत मिळत नाही. शेतकरी मेहनत करतो, पण त्याच्या मालाचे दर दुसरेच ठरवितात. यामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या शेती अाणि धान्य यामधे सरकारी हस्तक्षेप थांबवावा, निर्यात शुल्क वाढवावे, निर्यातीवरील निर्बंध हटविण्यात यावेच आदी मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुढील काळात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अॅड. चटप यांनी सांगितले. या मेळाव्याला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...