agriculture news in Marathi, shetkari sanghtna active on FRP, Maharashtra | Agrowon

‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात गाळपास दिलेल्या उसाला तत्काळ `एफआरपी' द्यावी आणि एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून `एफआरपी'साठी आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे. 

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात गाळपास दिलेल्या उसाला तत्काळ `एफआरपी' द्यावी आणि एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून `एफआरपी'साठी आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे. 

यंदा कमी पाऊसमानामुळे जेमतेम ऊस कारखान्याला गेला. पण त्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. नऊ साखर कारखान्यांनी एफआरपीचे पैसे थकवले आहेत. त्यांच्यावर कारवाईही सुरू आहे, पण ही कारवाई ठोस नाही. या वर्षी दुष्काळामुळे आता येत्या गळीत हंगामातही तुलनेने कमीच ऊस पुरवठा होणार आहे. त्यामुळे पुढे मोठे संकट उभे राहिले असताना, आता यंदाचेच पैसे मिळाले नाहीत. पुढच्या हंगामाचे काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रशासनाकडील १ मेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे जवळपास ९९६ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम मेअखेरपर्यंत मिळावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक विजय रणदिवे यांनी सांगितले की, `एफआरपी' साठी कारवाई करताना सरकारने पक्षीय भेदभाव केला आहे. कारखानदारांकडील थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी भेदभाव करू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा पैसा मिळावा, अन्यथा मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात एफआरपीसाठी आंदोलन केले जाईल.'' ळिराजा शेतकरी संघटनेचे संजय घाटणेकर यांनीही साखर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी `एफआरपी'साठी अनेक आदेश काढले आहेत. पण कारवाई होत नाही, त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे सांगितले.

रयतक्रांती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी मात्र "एफआरपची रक्कम मिळण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. या भेटीतून `एफआरपी'चा प्रश्‍न सुटेल, अशी आशा आहे. तरीदेखील हा प्रश्‍न न सुटल्यास मेअखेर `एफआरपी'ची रक्कम न मिळाल्यास जूनपासून शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.


इतर अॅग्रो विशेष
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...