शेतकरी संघटनेचे अंगाला हळद लावून आंदोलन 

जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसह इतर समस्या सरकारने सोडवाव्यात यासाठी भूमिपूत्र शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी (ता.२५) अंगाला हळद लावून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे अंगाला हळद लावून आंदोलन 
शेतकरी संघटनेचे अंगाला हळद लावून आंदोलन 

वाशीम: जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसह इतर समस्या सरकारने सोडवाव्यात यासाठी भूमिपूत्र शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी (ता.२५) अंगाला हळद लावून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणीचे निवेदन पाठवत तातडीने लक्ष देण्याची मागणीही केली होती. 

हळद हे प्रमुख मसाले पीक आहे. आयुर्वेदीक औषधी गुणधर्म असल्याने जिल्हयातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटाने हळदीला चार ते पाच हजार इतका अत्यल्प भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हळद हे वर्षभराचे पीक असून उत्पादन खर्च मोठया प्रमाणात करावा लागत आहे. सध्याचे भाव पाहता उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. त्यामुळे हळदीला किमान दहा हजार रुपये हमीभाव शासनाने द्यावा, पीकविमा संरक्षण मिळावे, शासनाने हळदीची खरेदी करावी, नैसर्गिक आपत्तीत हळद पिकाला मदत देण्यात यावी, शासनाच्या विविध योजने अंतर्गत यांत्रिकीकरण व सिंचनासाठी लागणारे साहित्य हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, पीककर्ज वाटपात एकरी पन्नास हजार रुपये पीककर्ज हळद उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com