शेतकरी संघटना शुक्रवारी करणार तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन

पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यातील शेतकरी देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. किसान समन्वय समिती, खेडूत किसान संघ यासारख्या विविध संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या माध्यमातून त्या राज्यांमध्ये देखील हे आंदोलन केले जाईल. - सतीश दाणी, शेतकरी संघटना, युवा आघाडी प्रमुख.
shetkari sanghtna
shetkari sanghtna

नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील तब्बल १७ कापूस उत्पादक जिल्ह्यांत तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.१२) होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून अनधिकृत एचटीबिटीची लागवड केली जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रमुख सतीश दाणी यांनी दिली. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यातील मुरसगाव  (खोसे) (ता. देवळी) येथील शेतकरी खुशाल हिवरकर यांच्या शेतात गुरुवारी (ता.४) एचटीबीटीची लागवड करत आंदोनलन केले.  तणाला प्रतिकारक कापूस वाण त्यासोबतच जीएम पिकांना मान्यता देण्यात यावी, अशी शेतकरी संघटनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याच मागणीच्या पूर्ततेसाठी गेल्या हंगामात विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एचटीबिटीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी देखील शेतकरी संघटनेने तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्यासाठी पुढाकार घेत एचटीबिटी लागवडीचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी राज्यातील १७ कापूस उत्पादक जिल्हयात आंदोलन केले जाईल. मी एचटीबिटी लागवडकर्ता आहे. मी दोषी आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे फलकही शेतकरी आपल्या शेतात झळकवतील, अशी माहिती शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com