agriculture news in Marathi shetkari sanghtna yatra in state Maharashtra | Agrowon

राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारपासून (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे ‘जनप्रबोधन यात्रा’ आयोजित केली आहे. 

नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारपासून (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे ‘जनप्रबोधन यात्रा’ आयोजित केली आहे. यानिमित्त राज्यातील सहा जिल्ह्यांत पंधरा दिवस विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.

महात्मा जोतिबा फुले यांचा २८ नोव्हेंबर रोजी स्मृती दिन आहे. तर १२ डिसेंबर हा परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणारे हुतात्मा बाबू गेनू यांचा बिलिदान दिवस आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या या दोन्ही महान व्यक्तींच्या स्मरणार्थ राज्यात होत असलल्या आत्महत्येचे कलंक पुसण्यासाठी शनिवारपासून (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे ‘जनप्रबोधन यात्रा’ आयोजित केली आहे.

यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात, तीन दिवस सांगली जिल्ह्यात, दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात, दोन दिवस नगर जिल्ह्यात, तीन दिवस पुणे जिल्ह्यात व दोन दिवस सातारा जिल्ह्यात मेळावे, बैठका घेऊन शेतकऱ्यांत प्रबोधन करणार आहे. 

१२ डिसेंबर रोजी सातारा येथे सभेत यात्रेचा समारोप होणार आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. पन्नास वर्षे सतत कर्जमाफीच्या चर्चा चालू आहेत. मागच्या आणि आताच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. उसाच्या  दराबाबतबी फारसे गांभीर्याने घेतले जात नाही, अशा अनेक बाबींवर सरकारचे दुर्लक्ष आहे. याविषयी जनप्रबोधन यात्रेतून शेतकऱ्यांत जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

...अशा आहेत मागण्या 

  • सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीजबिलातून मुक्त करणे व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत करणे.
  • शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे अप्रत्यक्ष कर कमी करण्याबाबत.
  • शेतीमालाच्या शेती उत्पादनातून तयार होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमतीची तुलना कच्च्या मालाशी करणे. 
  • सी. रंगराजन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आखणे. 
  • गोवंश हत्या बंदी, पाळीव प्राणी निर्णय वागणूक, वन्यजीव संरक्षण कायदा, भूसंपादन, आवश्यक वस्तू कायदा मुळासकट रद्द करणे यांसह शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे.
     

इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...