रत्नागिरीत पीककर्ज न घेतलेल्या ९३ हजारांवर लाभार्थ्यांनाही ‘शेतकरी सन्मान’चा लाभ

'shetkari sanman' to beneficiaries over 93 thousand non-crop loans in Ratnagiri
'shetkari sanman' to beneficiaries over 93 thousand non-crop loans in Ratnagiri

रत्नागिरी : ‘‘जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७८५ शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी आहेत; मात्र कोणत्याही व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकाकडून पीककर्ज न घेतलेले ९३ हजार १९८ पीएम किसान योजनेचे लाभार्थी शिल्लक आहेत. त्यांना बँकांकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या डीपार्टमेंट ऑफ फिनान्शिअल सर्व्हिसेसतर्फे विशेष  मोहीम राबविण्यात येणार आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

चव्हाण म्हणाले, ‘‘लाभार्थी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावेत, यासाठी आयबीए संस्थेकडून अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. तेथे संपर्क  साधावा.’’

‘‘परिपूर्ण अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झालेल्या प्रस्तावावर १५ दिवसांत बँकांमार्फत किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येईल. लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था, बँकांकडून पीककर्ज घेतलेले नाही, अशा व मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या आणि अल्प मुदत पीक घेणाऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा’’, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. 

यापूर्वी जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७८५ शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून ५८ हजार ५८७ लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com