राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
ताज्या घडामोडी
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या खटल्यातून शेट्टी, खोत निर्दोष मुक्तता
ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा परिसरात २०१२ व २०१३ मध्ये सलग दोन वर्षे झालेल्या आंदोलन प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते.
कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा परिसरात २०१२ व २०१३ मध्ये सलग दोन वर्षे झालेल्या आंदोलन प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नोव्हेंबर २०१२मध्ये आणि वाठार(जि. सातारा) येथे नोव्हेंबर २०१३ रोजी पाचवड फाटा येथे आंदोलन झाले होते. त्या दोन्ही आंदोलनाचे वेगवेगळे खटले दाखल होता. त्या खटल्यांचा निकाल शुक्रवारी (ता. १५) अतिरिक्त जिल्हा न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी दिली. त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता केली.
शेट्टी व खोत यांच्यातर्फे बचाव पक्षाचे वकील म्हणून ॲड. संग्रामसिंह निकम यांनी काम पाहिले. वाठार येथे नोव्हेंबर २०१२ मध्ये पुणे, बेंगळुरू महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे वाहनांचे टायर पेटवून महामार्ग रोको आंदोलन झाले होते. पोलिसांनी त्याबाबत गुन्हे दाखल केले होते. हवालदार खलील इनामदार यांनी फिर्याद दिली होती.
त्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या चिथावणीखोर भाषण केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळेच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रस्त्यावर फेकले, अशा पोलिसांचा निष्कर्ष होता. त्या शिवाय पोलिस वाहने, एसटी बस व अन्य खासगी दहा वाहनांवर दगडफेक केली होती.
दगडफेकीत दोन पोलिस निरीक्षकांसह अन्य दोन अधिकारी व चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे वाहनांचेही नुकसान झाले होते. नोव्हेंबर २०१३ रोजी पाचवड फाटा येथे ऊसदर प्रश्नी स्वाभिमानीने ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी वाठार येथे कुरुंदवाड आगाराच्या एसटीबसवर दगडफेक केली. त्यात चालक जखमी झाला होता. त्यांच्या फिर्यादीवरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व इतर गुन्हे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यावर दाखल होते.
दोन्ही खटल्याची सुनावणी कऱ्हाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. औटी यांच्यासमोर झाली. त्यात बचाव पक्षाच्यावतीने ॲड. संग्रामसिंह निकम यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. औटी यांनी प्रत्यक्ष घटनेवेळी राजू शेट्टी व सदाभाऊ खोत उपस्थित नसल्याचे मत नोंदवत दोघांची या दोन्ही खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील ॲड. संग्रामसिंह निकम शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी जवळपास ४७ हून अधिक खटल्यांमध्ये शेतकरी नेते व कार्यकर्त्यांसाठी न्यायालयात विनाशुल्क काम केले आहे. यापुढेही शेतकऱ्यांसाठी आपण कर्तव्य म्हणून हे काम करणार असल्याचे ॲड. निकम यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
- 1 of 1053
- ››