Agriculture News in Marathi Shetty's settlement with the factories | Agrowon

शेट्टींची कारखान्यांशी सेटलमेंट : धनाजी चुडमुंगे

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

स्वाभिमानीने शेतकऱ्यांवर बोलू नये. शेट्टी यांनी कारखान्याबरोबर सेटलमेंट केले आहे, असा आरोप ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

जयसिंगपूर, जि कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’वरील पंधरा टक्के व्याज देणे बंधनकारक आहे. व्याजाचे कोट्यवधी रुपये थकीत असताना ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी व पदाधिकाऱ्यांनी साखर कारखान्याला व्याज नको म्हणून करारपत्रे दिली आहेत. त्यामुळे स्वाभिमानीने शेतकऱ्यांवर बोलू नये. शेट्टी यांनी कारखान्याबरोबर सेटलमेंट केले आहे, असा आरोप ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

चुडमुंगे म्हणाले, ‘‘एकरकमी एफआरपी, तसेच पंधरा टक्के व्याजाची लढाई आंदोलन अंकुशने जिंकली आहे. मात्र दहा वर्षांपासून शेट्टी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत नाहीत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत शंभर कोटी व्याज थकीत आहे.

२ जुलैला शेट्टी यांनी दिलेल्या मुलाखतीत व्याज घेतल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगितले होते. ८ जुलैला शेट्टी यांनी कारखान्यांना पंधरा टक्के व्याजदर नको म्हणून करारपत्रे लिहून दिले आहेत. त्यामुळे शेट्टी कारखानदारांना फितूर झाले आहेत. एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, असे बाहेर म्हणायचे आणि आतून कारखानदारांना सामील व्हायचे हा प्रकार घातक आहे.

स्वाभिमानीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कारखानदार मनाला येईल तशी बिले देऊ लागल्यास शेतकरी अडचणीत सापडेल. त्यामुळे आंदोलन अंकुश गप्प बसणार नाही.’’  या वेळी उदय होगले, आप्पासो कदम, बंडू होगले, अमोल गावडे, दत्त जगदाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यायचे आहेत, की आम्हाला बदनाम करायचे आहे, हे आधी आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवावे. पत्रकार बैठकीत दिलेले पुरावे खरे आहेत का, हे आधी स्पष्ट करावे. 
-राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स

इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...