agriculture news in marathi Shevaga, eggplant to the city Survive rates | Agrowon

नगरला शेवगा, वांग्यांचे दर टिकून; ज्वारी आवक सुरु

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 मार्च 2021

 नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात शेवगा, वांग्यांसह इतर भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. भुसारमध्ये ज्वारी, हरभऱ्याची आवक सुरु 
झाली आहे.  

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात शेवगा, वांग्यांसह इतर भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. भुसारमध्ये ज्वारी, हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे.  

 नगर बाजार समितीत भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. तरी दरात मात्र सातत्याने चढउतार होत आहे. येथे टोमॅटोचे दर दिवसाला ७० ते ८० क्विंटलची आवक होत आहे. ५०० ते १ हजाराचा दर मिळाला. वांग्यांची २४ ते ३० क्विंटलची आवक झाली.

५०० ते १ हजार फ्लॉवरची ९० ते ९५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार ५०० रुपये, कोबीची ५० ते ६० क्विंटलची आवक होऊन ४०० ते ६०० रुपये, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार ५००, गवारची ४ ते ५ क्विंटलची आवक झाली. ६ हजार ते ९ हजार, दोडक्याला ११ ते १५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० रुपये, घोसाळ्याची ४ ते ६ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, कारल्याची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार रुपयांचा दर मिळाला. 

हिरव्या मिरची २००० ते ३०० रुपये

भेंडीची ३० ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार २००, वाल शेंगांची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन २ हजार पाचशे ते ३ हजारांचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ७० ते ७५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार रुपये, शेवग्याची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, आल्याची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार रुपये, शिमला मिरचीची ३३ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, करडी भाजी, शेपूचीही आवक बऱ्यापैकी होती. मात्र दरात काहीशी तेजी होती, असे बाजार समितीतून सांगण्यात आली.


इतर बाजारभाव बातम्या
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...
पुण्यात लिंबू, संत्र्यांची मागणी, दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबाव वाढण्यास...जळगाव : देशातील विविध भागांत टाळेबंदी,...
सोलापुरात बेदाण्याला कमाल २५१ रुपये दरसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीत हलकी घटनागपूर ः विदर्भात सर्वदूर देशांतर्गत मागणी...
खानदेशात बाजारात मका दर स्थिरजळगाव ः खानदेशात बाजारात मक्याची आवक वाढली आहे....
नाशिकमध्ये आंबा प्रतिक्विंटल २५ हजार...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात खरबूज ५०० ते २००० रुपयेअकोल्यात क्विंटलला १००० ते १८०० रुपये अकोलाः...
खानदेशात काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणाजळगाव  ः  खानदेशात या आठवड्यात बाजार...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...