Agriculture news in marathi Shevaga in the nagar is 4 to 6 thousand rupees per quintal | Agrowon

नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून भाजीपाल्याची बऱ्यापैकी आवक सुरू आहे. बाजार समितीत शेवग्याची पंधरा ते पंचवीस क्विंटलची आवक होत आहे. शेवग्याला चार ते सहा हजार रुपयाचा प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून भाजीपाल्याची बऱ्यापैकी आवक सुरू आहे. बाजार समितीत शेवग्याची पंधरा ते पंचवीस क्विंटलची आवक होत आहे. शेवग्याला चार ते सहा हजार रुपयाचा प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. भुसारमध्ये गावरान ज्वारीची बऱ्यापैकी आवक होत आहे. प्रतिक्विटंलला १९०० ते  ३००० रुपयांचा दर मिळत आहे. 

टोमॅटोची दर दिवसाला शंभर ते सव्वाशे क्विंटलची आवक होत आहे. वांग्याची ३० ते ४० क्विंटलची आवक, तर दर ५०० ते २५००, कोबीची ४० ते ५० क्विंटलची आवक; तर दर ५०० ते १००० रुपये, गवारची १२ ते २० क्विंटल आवक; तर दर चार हजार ते सहा हजार, दोडक्याची १० ते २० क्विंटल आवक, दर तीन हजार ते चार हजार, कारल्याची तीस ते चाळीस क्विंटल आवक; तर दर दोन हजार ते चार हजार, बटाट्याची २७० ते ३०० क्विटंल आवक, तर दर १०० ते २१०० रुपये मिळाला.

लसणाची १२ ते २५ क्विंटली आवक, तर दर ४००० ते नऊ हजार, हिरव्या मिरचीची ७० ते १०० क्विटंल आवक, तर दर एक हजार ते साडेतीन हजार रुपये मिळाला. आद्रक, गाजर, कोथिंबीर, पालक, मेथी, चुका, शेपूच्या भाजीलाही चांगली मागणी राहिली.

बाजरी १३०० ते १९०० रुपये क्विंटल

बाजरीची दहा ते वीस क्विंटलची आवक होऊन १३०० ते १९००, तुरीची तीस ते चाळीस क्विंटलची आवक होऊन ४९०० ते ५१०० रुपये, हरभऱ्य़ाची वीस ते चाळीस क्विंटलची आवक होऊन ३९०० ते ४१०० रुपये, उडदाची पाच ते दहा क्विंटलची आवक होऊन ५ हजार पाचशे, रुपयाचा दर मिळाला, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...