Agriculture news in marathi, Shevaga Rs. 2000 per 10 kg | Page 4 ||| Agrowon

शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलो

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत सुमारे २० ट्रकने घट झाली.

पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत सुमारे २० ट्रकने घट झाली. मात्र सिमला मिरची आणि शेवग्याच्‍या आवकेत घट झाल्याने त्यांच्या दरात वाढ झाली होती. तर शेवग्याचे दर दहा किलोला २ हजार रुपयांपर्यंत वाढला होता. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते

भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतील आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेश आणि पंजाब येथून अनुक्रमे प्रत्येकी ७ आणि १ असे एकूण ८ ट्रक मटार, आंध्र प्रदेश येथून अवघा १ टन शेवगा, राजस्थान येथून ८ टेम्पो गाजर, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे १० ट्रक आवक झाली. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे २ हजार गोणी, टोमॅटो ७ हजार क्रेट, कोबी ७ टेम्पो, फ्लॉवर सुमारे १५ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे ५० गोणी, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा सुमारे ७० ट्रक, आग्रा, इंदूर, येथून बटाटा सुमारे १० ट्रक आवक झाली.  

फळभाज्यांचे १० किलोचे भाव 

कांदा : १५०-२२०, बटाटा १५०-२००, लसूण : १५०-३५०, आले : सातारी १००-२००, भेंडी : ३००-४००, गवार : ४००-६००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००- २५०, काकडी : २५०-३००, कारली हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : १५०-२००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : १००-१५०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : २००-२५०, ढोबळी मिरची : २५०-५५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड, १८०-२००, शेवगा : २०००, गाजर २५०-३००, वालवर १५०-२००, बीट : १५०-२००, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेग : ३५०-४५०, मटार : परराज्य -५००-६५० पावटा : २००-३००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ : शेकडा १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्यांचे दर 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची १ लाख २५ हजार, तर मेथीची ४० हजार जुड्या आवक झाली. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-६००, मेथी : ५००-७००, शेपू : ७००-८००, कांदापात : १२००-१५००, चाकवत : ८००-१०००, करडई : ६००-८००, पुदिना १००-३००, अंबाडी ८००-१०००, मुळे: १२००-१६००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-७००, चवळई : ५००-८००, पालक : ४००-७००, हरभरा गड्डी ः ५००-८००.

फळबाजारात रविवारी (ता.२८) लिंबांची सुमारे तीन हजार गोणी, डाळिंबांची सुमारे २० टन, मोसंबी ७० टन, संत्रा २० टन, पपई १५ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरूची सुमारे ८०० क्रेट, सीताफळ १२ टन, कलिंगड ३, तर खरबूज ४ टेम्पो, आणि विविध बोरांची सुमा ४५० गोणी आवक झाली. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : १००-२५०, मोसंबी : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ५० -१२०, संत्रा : (१०किलो) : १००-६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-२००, गणेश : १०-६०, आरक्ता १०-५०, कलिंगड : १२-३०, खरबूज : २२-२५ पपई : १०-१२, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो): ३००-४००, सीताफळ २०-१२५. बोरे (प्रति १० किलोचे दर) ः चण्यामण्या ५५०-६५०, चेकनट ५५०-६५०, उमराण ५०-७०, चमेली १५०-२००. 

फुलबाजार 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-७०, गुलछडी : २५-५०, ॲस्टर (५ जुड्या) ः १६-२५, सुटा ८०-१५०, कापरी : ३०-६०, शेवंती : ३०- ६०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : ३०-७०, गुलछडी काडी : ४०-१००, डच गुलाब (२० नग) : ८०-२८०,  जरबेरा : ६०-१००, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १५०- ३००, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३००-५००, ग्लाडिओ (१० काड्या) : ६०-१५०, चमेली ६००-८००.

मटण-मासळी 

गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता.२८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीच्या मासळीची २०० किलो, नदीच्या मासळीची सुमारे एक टन, तर, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे १५ टन आवक झाली. खोल समुद्रातून होणारी मासळीची आवक कमी झाली. त्यामुळे पापलेट, सुरमई, हलवा, रावस यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. तर कोळंबीचे दर स्थिर असल्याची माहिती मासळीचे घाऊक व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मटण आणि चिकनचे दर स्थिर असल्याचे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे तसेच चिकन विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले.

  खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १३००-१४००  मोठे-१३०० मध्यम : १०००-११००, लहान ७००-८००, भिला : ५००-५५०, हलवा : ५८०-७००, सुरमई : ४००-५५०, रावस : लहान ५००-६००,  मोठा : ८००-८५०, घोळ : ५५०-६००, करली : २००-२४०, पाला : ४००-१२००, वाम : ६००-७०० करंदी-१२०-१४०, ओले बोंबील : १००-१६०, भिंग-३६०

  कोळंबी : लहान २८०-३६०,  मोठी-४४०-५५०, जंबो प्रॉन्स : १०००-१२००  किंग प्रॉन्स : ७५०- ८००,  लॉबस्टर : १५००-१६००, मोरी : २००-२८०, खेकडे  : ३००-४०० चिंबोऱ्या : ४००-४८०, मांदेली-१००-१६०, राणीमासा-१६०-२००
  खाडीची मासळी : सौंदाळे-२००-२४०, खापी-२००-२४०, नगली : २००-२४०, तांबोशी : ३२०-३६०, पालू- २४०, बांगडा : लहान-१६०, बांगडा मोठा- २००-२४० शेवटे २००, तिसºया: २४० , खुबे : १२०, लेपा-१६०-२००, पेडवी-१००, वेळुंजी-१२०-१६०, तारली-२००

 नदीतील मासळी : रहू-१२०-१६०, कतला-१३०-१६०, मरळ-४००-४४०, शिवडा-१६०-२००, खवली-१६०-२००, आम्ळी-१००-१४०, खेकडे-२००-२४०, वाम-४००-४८०

 मटण- बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८०, खिमा-६८०, कलेजी-७२०
  चिकन २०० , लेगपीस-२५० , जिवंत कोंबडी-१५०, बोनलेस-३००
  अंडी
  गावरान शेकडा ८९०, डझन १२०, प्रतिनगास १०
  इंग्लिश शेकडा ४९०, डझन ७२,  प्रतिनगास ६


इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...