agriculture news in marathi Shevaga to the town, good rate to Ghewda; Low income | Agrowon

नगरला शेवगा, घेवड्याला चांगला दर; आवक कमी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 जुलै 2021

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात घेवडा, शेवग्याला चांगला दर मिळाला. भुईमुगाच्या ओल्या शेंगांचीही दर दिवसाला पंधरा क्विंटलपर्यंत आवक होत आहे. 

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात घेवडा, शेवग्याला चांगला दर मिळाला. भुईमुगाच्या ओल्या शेंगांचीही दर दिवसाला पंधरा क्विंटलपर्यंत आवक होत आहे. 

नगर येथील बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून  भाजीपाल्याची दर दिवसाला १ हजार ते ११०० क्विटंलपर्यत आवक होत आहे. आठवडाभरात दर दिवस घेवड्याची १ ते २ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते सहा रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. शेवग्याची ८ ते १० क्विंटलची आवक झाली. त्यास २ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.

टोमॅटोची २४५ ते २५० क्विंटलची आवक झाली. ५०० ते १ हजार, वांग्यांची ३१ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५००, फ्लॉवरची ८७ ते ९० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, कोबीची ९५ ते १०० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १३००, काकडीची ८९ ते ९५ क्विटंलची आवक होऊन ५०० ते १५०० हजार, गवारीची ५ ते ७ क्विंटलची २ ते ५ हजार, भेंडीची २८ ते ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, वालची ४ ते ८ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळाला.  

बटाट्याची २४५ ते २५० क्विंटलची आवक होऊन ७०० ते ११००, हिरव्या मिरचीची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार, आल्याची २१ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार, लिंबांची पाच ते सात क्विटंलची आवक होऊन ५०० ते १ हजार, शिमला मिरची ३१ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार २०० रुपये, वाटाण्याची ३९ ते ४२ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते  ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, करडी भाजीची आवक चांगली राहिली, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले. 

 डाळिंबाला दहा हजारापर्यंतचा दर 

नगर बाजार समितीत जर दिवसाला डाळिंबांची १४० ते १५० क्विंटलची आवक होत आहे. त्यांना १ हजार रुपयापासून ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. मोसंबीची १९ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ५ हजार, संत्र्यांची २ ते ३ क्विंटलची आवक झाली. त्यास २ हजार ते ८ हजार, सीताफळांचीही आवक सुरु झाली आहे. सीताफळांची दर दिवसाला ३ ते ४ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ६ हजाराचा दर मिळत आहे.


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...