agriculture news in marathi shevagya, Dodka rate improve in Nagar | Agrowon

नगरमध्ये शेवग्यासह दोडका दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 जुलै 2021

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दोडका, शेवग्याच्या दरात तेजी राहिली. आवकही चांगली राहिली.

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दोडका, शेवग्याच्या दरात तेजी राहिली. आवकही चांगली राहिली. भुसारमध्ये ज्वारी, हरभरा, गव्हाची बऱ्यापैकी आवक सुरु होती. कांद्याचे दर गेल्या आठवड्यात स्थिर राहिले, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर बाजार समितीत भाजीपाला, भुसार, कांद्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. टोमॅटोची दर दिवसाला १७५ ते १८० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची २७ ते३० क्विंटलची आवक झाली. १ हजार ते ३ हजार, फ्लॉवरची ९ ते १५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कोबीची ४८ ते ५० क्विंटलची आवक होऊन ८०० हजार १ हजार ५००, काकडीची ४५ ते ५० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १ हजार ६००, गवारीची ३ ते ६ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजारांचा दर मिळाला. 

दोडक्याची ८ ते १० क्विंटलची आवक झाली. दर ३ हजार ते ५ हजार रुपये, घोसाळ्याची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन ३ हजार, कारल्याची १४ ते १६ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला. भेंडीची १८ ते २० क्विंटलची आवक, तर दर २ हजार ते ४ हजार, वाल शेंगांची २ ते ४ क्विंटलची आवक, दर ३ हजार ते ५ हजार रुपये मिळाला. लसणाची १ ते २ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला. 

हिरव्या मिरचीची १५ ते २० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार, शेवग्याची १ ते २ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. शिमला मिरचीची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते २ हजार ७००, बटाट्याची ८५ ते ९० क्विंटलची आवक होऊन १००० ते १६०० रुपयांचा दर मिळाला. 

गावरान ज्वारीला ३ हजारांचा दर 

नगर बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून गावरान ज्वारीची आवक वाढली आहे. या ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजारापर्यंत दर मिळाला. तुरीला ६ हजारापर्यंत, तर उडदाला ६ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळाला. गव्हाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. गव्हाला २ हजारापर्यंत, तर सोयाबीनला ६ हजार १००, चवळीला ५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...