नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रति हेक्टरी कापूस उत्पादकता
बाजारभाव बातम्या
नगरमध्ये शेवंतीची फुले चारशे रुपये किलो
नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे फूल उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने फुलशेती चांगलीच बहरली आहे. त्यामुळे दिवाळीत फुलबाजार चांगलाच फुलला.
नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे फूल उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने फुलशेती चांगलीच बहरली आहे. त्यामुळे दिवाळीत फुलबाजार चांगलाच फुलला. आज (शनिवारी) फुलांना मागणी
असल्याने शेवंतीचा किरकोळ बाजारात ४०० रुपये प्रतिकिलो दर होता. दरवेळी वीस ते तीस रुपये किलोने विकावा लागणारा झेंडूही शंभर रुपये किलोच्या पुढे होता.
नगरमध्ये गेल्या दोन महिन्यांत दमदार पाऊस झाला. नवरात्रोत्सवात जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. दसरा- दिवाळी डोळ्यासमोर ठेवून बागायतदार शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. मात्र ऐन नवरात्रोत्सवात झालेल्या पावसामुळे, काढणीस आलेली फुले खराब होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती नेहमीपेक्षा कमी पीक आले.
शिवाय, पुरेसा भावही दसऱ्याच्या वेळी मिळाला नाही. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने फुलशेती चांगलीच बहरली आहे. बाजारपेठेतही फुलांना मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. शहरातील मार्केट यार्डमध्ये आज सकाळपासूनच फुलांची मोठी आवक झाली.
फुलांचे किरकोळ बाजारातील दर (किलोप्रमाणे)
- झेंडू १०० ते २००
- शेवंती ४००
- ॲस्टर ३५० ते ४००
- गुलटोप १५० ते २००
- गुलाब ३०० (सुटा)
- गुलछडी ५००
- तुळजापुरी १०० ते १२०
- 1 of 65
- ››