agriculture news in marathi Shevanti week starts in Manjari, Pune | Agrowon

शेवतींच्या फुलांनी जिंकले मन ! आठवड्याला प्रारंभ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी शेतकऱ्यांचे मन जिंकले. निमित्त होते पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘शेवंती आठवडा’चे. शेकडो शेवंतीच्या वाणांची मेजवानी एकाच क्षेत्रावर येथे पाहायला मिळत आहे. 

मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी शेतकऱ्यांचे मन जिंकले. निमित्त होते पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘शेवंती आठवडा’चे. शेकडो शेवंतीच्या वाणांची मेजवानी एकाच क्षेत्रावर येथे पाहायला मिळत आहे. 

पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने आयोजित शेवंती आठवडा आणि राष्‍ट्रीय कृषी संशोधन संस्थांच्या वतीने शुक्रवारी (ता.६) आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उप महासंचालक डॉ. ए. के. सिंग, पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के.व्ही. प्रसाद, द्राक्ष संशोधन संस्थेच्या डॉ. अनुराधा उपाध्याय, कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मेजर सिंग, अवैजिक ताण विरोध संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना डॉ. सिंग म्हणाले,‘‘शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये उतरल्यासारखे स्पर्धक म्हणून आधुनिक शेती केल्यास जोखीम कमी होईल. त्यासाठी पांरपारिक पिके आणि पद्धतीतून बाहेर पडत बाजारपेठभिमुख पिके घेण्याची गरज आहे.’’

विविध रंगी शेवंतीच्या फुलांची मेजवाणी.. पहा video...

डॉ.सिंग म्हणाले,‘‘ पंतप्रधानांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात शेतकऱ्यांचा लक्षणीय सहभाग असणे आवश्‍यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके सोडून फळबागा, पुष्प शेतीकडे वळण्याचे गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी स्पर्धेमध्ये उतरल्यासारखे स्पर्धक म्हणून आधुनिक शेती करणे गरजेचे आहे. केवळ पारंपरिक पिके आणि पीकपद्धतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार नाही. यासाठी फळबागा, पुष्पशेती, प्रक्रिया, मूल्यवर्धनाकडे देखील वळणे गरजेचे आहे.’’

१२ डिसेंबरपर्यंत आयोजन
पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने केशवनगर (मांजरी) येथील प्रक्षेत्रावर शेवंती आठवडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १२ डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी खुला असून, या ठिकाणी शेवंतीच्या १५० पेक्षा अधिक विविध वाणांची लागवड करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या अपेक्षा
शेतकऱ्यांनी विविध फुलांच्या जास्त दिवस टिकणाऱ्या वाणांचे संशोधन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर नर्सरी उद्योगाकडून देखील कुंडीतील सुवासिक फुलांच्या वाणांची मागणी वाढत असल्याने त्यावर संशोधन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...