सिंधूताई विखे पाटील यांचे निधन

सिंधूताई विखे पाटील यांचे निधन
सिंधूताई विखे पाटील यांचे निधन

शिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पत्नी सिंधूताई (वय ८५) यांचे रविवारी (ता.१८) पहाटे पावणेसहाच्या सुमारास प्रवरा ग्रामीण रुग्णालयात निधन झाले. प्रवरानगर येथे पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील मैदानात त्यांच्यावर दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक विखे पाटील, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राजेंद्र विखे पाटील यांनी पार्थिवास मंत्रोच्चारात अग्नी दिला.

सिंधूताई यांनी लोणी बुद्रुक येथे प्रियदर्शन महिला मंडळ, प्रियदर्शनी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, प्रियदर्शनी महिला पतसंस्था, महिला शिवणकाम प्रशिक्षण केंद्र, महिला लघुउद्योजक केंद्र, प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक विद्यालय स्थापन केले, तसेच अद्वैत भजनी मंडळ सुरू केले. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने, तसेच राज्य सरकारच्या वतीने पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com