Shipping from Koyna Dam: Deputy Chief Minister Pawar
Shipping from Koyna Dam: Deputy Chief Minister Pawar

कोयना धरणातून होणार जलवाहतूक ः उपमुख्यमंत्री पवार

सातारा ः कोयना परिसरात पर्यटनाला चालना मिळून त्या परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, धरण परिसरातील गावांसाठी दळणवळणाचा मार्ग खुला व्हावा या उद्देशाने कोयना धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात धरणाच्या सुरक्षेची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. ३) स्पष्ट केले. 

कोयना धरण जलवाहतुकीसंदर्भात विधान भवनात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी श्री. पवार म्हणाले, ‘‘कोयना धरणाच्या सुरक्षेला बाधा येणार नाही, याची काळजी घेऊन धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात विचार व्हावा. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गृह, जलसंपदा, वन विभागाच्या समन्वयाने अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जलवाहतुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना, त्यासाठीचे अंतर ठरविताना प्रथम धरणाच्या सुरक्षेचा विचार करावा.’’

सध्या असलेली जेटी पोलिस पेट्रोलिंगसाठी योग्य असून, जलवाहतुकीसाठी नवीन जेटीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्‍चित करावी, अशाही सूचना त्यांनी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com