Shirpur Market Committee Will be working during the day
Shirpur Market Committee Will be working during the day

शिरपूर बाजार समिती दिवसाआड कार्यरत राहणार

जळगाव ः खानदेशात शिरपूर (जि. धुळे), जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर बाजार समित्या प्रमुख मानल्या जातात. परंतु या बाजार समित्यांमधील कामकाज गेल्या महिनाभरापासून रखडत सुरू आहे.

जळगाव ः  खानदेशात शिरपूर (जि. धुळे), जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर बाजार समित्या प्रमुख मानल्या जातात. परंतु या बाजार समित्यांमधील कामकाज गेल्या महिनाभरापासून रखडत सुरू आहे. यातच शिरपूर बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (ता. १७) एक दिवसाआड सुरू राहणार आहे. 

आठवड्यात फक्त तीन दिवस कामकाज किंवा लिलाव सुरू राहतील. त्यात एका दिवसात फक्त एकाच शेतीमालाचा लिलाव होईल. त्यात भुईमूग शेंगा, धान्य यासाठी दिवस निश्चित केले आहेत. पण सध्या शेंगा, मका, गहू, ज्वारीची आवक वाढली आहे. यामुळे बाजार समिती रोज सुरू करा व लिलाव प्रक्रिया सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत पार पाडा, अशी मागणी केली जात आहे. 

शिरपूर बाजार समिती मका, हरभरा, गव्हासाठी खानदेशात प्रसिद्ध आहे. ती बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान वाढेल, असे शेतकऱ्यांचे मत आहे. चोपडा, अमळनेर येथील बाजार समितीदेखील व्यवस्थितपणे कार्यरत नाही. चोपड्यातही आठवड्यातून दोन किंवा तीनच दिवस कामकाज होत आहे. कोरोनाचे संकट असल्याने लसीकरणाची मागणी बाजार समितीतर्फे सतत केली जात आहे. जळगाव बाजार समितीत लिलाव ठप्प आहेत. अनेक अडतदार कोरोनाग्रस्त होते. यामुळे ही मंडळी बाजार समितीत येत नाही.

कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही व्यवहार पूर्ण करून घेत आहेत. लिलाव प्रक्रिया बंद असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी, गहू बाजार समितीत अडतदारांकडे पडून आहे. काही अडतदार बाजार समितीत येतात. पण सकाळी ११ पर्यंतच व्यवहार सुरू असतात. नंतर व्यवहार पार पाडले जात नाहीत. यामुळे सर्व प्रक्रिया रखडली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य दर मिळत नसल्याची स्थिती आहे. 

प्रशासनाकडून परवानगी मिळेना  

बाजार समितीमधील संचालक व शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासह कामकाज दिवसभर सुरू करण्याची भूमिका शेतकरी हितासाठी घेतली. पण प्रशासन कोरोनाचे कारण, नियमांचे मुद्दे सांगून बाजार समितीचे कामकाज पूर्ववत करण्याची परवानगी देत नसल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com