शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍नांवर रंगणार लढत

शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍नांवर रंगणार लढत
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍नांवर रंगणार लढत

पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक नगरी’ असा लौकिक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शेती, बेरोजगारी, महामार्गावरील वाहतूक कोंडी या प्रश्‍नांवर निवडणूक लढली जात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत होणार आहे. डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीने लढतीत रंगत आणली असून, खा. आढळराव यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.   गेली तीन टर्म प्रतिनिधित्व करत असलेले खा. आढळराव यांच्या उमेदवारीवर शुक्रवारी (ता. २२) शिवसेनेने शिक्कामोर्तब केले. तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने एन वेळी अभिनेते डॉ. कोल्हे यांना उमेदवारी देत पक्षातून तगडा उमेदवार दिला आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. आढळराव यांनी शिवनेरी ते वढू विजयी निर्धार यात्रा काढली होती. तर कोल्हे यांच्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भोसरी येथे सभा घेत प्रचाराचा नारळ वाढविला. या मतदारसंघात जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर हे ग्रामीण आणि शेतीबहुल मतदारसंघाचा तर हडपसर आणि भोसरी या शहरी आणि औद्योगिक नगरी असलेल्या मतदारसंघाचा समावेश आहे. यामुळे शेती, बेरोजगारी आणि वाहतूक कोंडी या प्रश्‍नावर ही निवडणूक रंगणार आहे. गेल्या १५ वर्षात शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विद्यमान खासदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होत आहे. तर आपण मतदारसंघात रस्ते, महामार्ग निर्मितीसाठी १४ हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा खा. आढळराव यांच्याकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवख्या असलेल्या डॉ. कोल्हे यांच्या तुलनेत आढळराव यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून ती त्यांच्या जमेची बाजू आहे. गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून सर्वच तालुक्‍यांत संपर्क असलेल्या आढळराव यांच्या तुलनेत डॉ. कोल्हे यांच्यासमोर कमी दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचे मोठे आव्हान आहे. तरीही यापूर्वी नेहमीच एकतर्फी होणारी व आढळराव यांना सहजसोपी वाटणारी यंदाची निवडणूक मात्र डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे अटीतटीची होण्याची शक्यता आहे. खा. आढळराव यांच्या जमेच्या आणि नकारात्मक बाजू  जमेच्या बाजू

  • दांडगा जनसंपर्क
  • रस्ते विकासासाठी १४ हजार कोटींच्या निधीचा दावा
  • भाजपाबरोबर झालेल्या युतीमुळे फायदा 
  • नकारात्मक बाजू 

  • शेती प्रश्‍नांच्या अभ्यासाचा अभाव 
  • खेड विमानतळ पुरंदरला स्थलांतरित झाल्याचा रोष 
  • पुणे-नाशिक, नगर, सोलापूर महामार्गाचे रेंगाळलेले काम आणि वाहतूक कोंडी
  • डॉ. कोल्हे यांच्या जमेच्या आणि नकारात्मक बाजू  जमेच्या बाजू 

  • शिवाजी, संभाजी यांच्या भूमिकांमुळे लोकप्रियता
  • नवीन चेहेरा
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कुमक  
  • शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेशामुळे होणारी टीका 
  • जनसंपर्काचा अभाव
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने काम करणार का?
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com