शिरवाडेत ऊस, द्राक्ष बाग खाक

शिरवाडेत ऊस, द्राक्ष बाग खाक
शिरवाडेत ऊस, द्राक्ष बाग खाक

नाशिक  : निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथे (ता. २५) रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊस, द्राक्षे बाग जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. 

येथील गोरक्षनाथ मंदिराजवळील रोहित्रावरील पिनइन्सुलेटरमधून तार तुटून खाली पडली. ती पोलला लागल्याने शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे रोहित्रातील ऑइलने पेट घेतला. त्यामुळे जवळील किसन नामदेव आवारे यांच्या गट नंबर ८० मधील उसाने पेटला. परिसरातील सुमारे १०० नागरिकांनी उसाच्या बांड्या, झाडांच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे ऊस जळून खाक झाला.

उसाशेजारीच शिवाजी नामदेव आवारे यांनी द्राक्षेबाग आहे. त्यासही आग लागली. त्यामुळे द्राक्षवेलींची सुमारे २०० झाडे, ठिबकसिंचन संच व पाइपलाइन जळून खाक झाली. 

या परिसरात मोठी लोकवस्ती असून जवळपास सर्वांनीच चारा साठवणूक केली. वाकदचे कनिष्ठ अभियंता ए. टी. पाटील, तारतंत्री दीपक जाधव, कामगार तलाठी नंदकिशोर गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

शिवाजी आवारे यांनी बिकट आर्थिक परिस्थिती आणि पाणीटंचाईवर मात करून नवीन द्राक्ष बाग फुलवली. त्यांचे या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे व किसन आवारे यांचे साठ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच बाळासाहेब आवारे, साहेबराव तनपुरे, भाऊसाहेब आवारे, सरपंच सुरेखा चिताळकर, संदीप आवारे, रामनाथ तनपुरे आदींनी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com