नगरमध्ये शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू 

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने शिवभोजन योजनेत बदल केला असून, ही शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर शहरात दहा केंद्रांना मंजुरी दिली.
Shiv Bhojpur centers resume in the Nagar
Shiv Bhojpur centers resume in the Nagar

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने शिवभोजन योजनेत बदल केला असून, ही शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर शहरात दहा केंद्रांना मंजुरी दिली. 

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने ही योजना बंद केली होती. मात्र, गरीब अन्नावाचून वंचित राहू नयेत, यासाठी पुन्हा ही योजना सुरू केली आहे. यासाठी सकाळी ११ ते दुपारी तीन ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. 

शिवभोजन केंद्रांवर येणाऱ्या गरजूंना पार्सल देण्यात येत होते. गर्दी टाळण्यासाठी त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्स ठेवला जात होता. केंद्रांच्या बाहेर यासाठी मार्किंग करण्यात आले होते. मंगळवारी (ता. ३१) दहापैकी सात केंद्रांवर शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. केंद्रचालकही स्वच्छतेचे भान ठेवत गरजूंना भोजन देत होते. शिवभोजन योजना सरकारने पुन्हा सुरू केल्याने गरजूंनी सरकारला धन्यवाद दिले आहेत. 

एक एप्रिलपासून विस्तार  जिल्ह्यात एक एप्रिलपासून शिवभोजन थाळीचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्‍यात १५० थाळ्या देण्यात येणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत गर्दी टाळावी, स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com