शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती’ पुरस्कार

'Shiv Chhatrapati' award won by the daughter of a farm laborer
'Shiv Chhatrapati' award won by the daughter of a farm laborer

अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील मुलीने थेट ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापर्यंत मजल मारण्याचे कार्य केले आहे. अकोला जिल्ह्यातील दानापूर (ता. तेल्हारा) गावातील अर्चना अढाव हिने हा पुरस्कार कमवीत संपूर्ण महिलांसाठी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अभिमानाचा क्षण मिळवून दिला. तिच्या या भरारीमागे आईचे कष्टही उजळले. 

अर्चना ही दीड महिन्यांची असताना वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर तिची आईच अर्चनासह दोन बहिणींसाठी सर्व काही झाली. मुलींना शिक्षणात काहीही कमी पडू नये, यासाठी त्यांनी शेतांमध्ये कामे केली. अर्चनामध्ये एक खेळाडू लपलेला आहे, हे शालेय स्तरावरच स्पष्ट झाले. परिस्थिती नसतानाही अर्चनाचे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ॲथलेटिक्समध्ये ‘दानापूर एक्सप्रेस’ म्हणून भारतभर नाव गाजवणाऱ्या अर्चना अढावला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने आई ताई अढाव यांची मान अभिमानाने उंचावली आहे. 

अर्चनाने आयुष्याच्या खडतर ट्रॅकवर धावत अनेक शिखरे गाठली आहेत. अर्चनाचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत झाले. पाचव्या वर्गात येथील हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयात दाखल करण्यात आले. येथूनच तिच्या कारकिर्दीने यशाचा ट्रक पकडला. तालुका, जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर ती धावू लागली. तिच्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यात दानापूरच्या हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. अजेय विखे यांनी मोठा हातभार लावला. तिला आर्थिक सहकार्य करून पुण्यातील बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. येथे योग्य प्रशिक्षण मिळाल्याने ती देशासाठी ऑलिंपिकही खेळू शकली. अर्चनाला हा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

अर्चनाची कारकीर्द 

  • चीनमध्ये ज्युनिअर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक
  • अमेरिकेतील जागतिक ज्युनिअर स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व
  • पटियाला येथे आयोजित वरिष्ठ फेडरेशन चषक स्पर्धेत ८०० मीटरमध्ये सुवर्णपदक. भुवनेश्वर येथील आशियाई स्पर्धेत सहभागी
  • राष्ट्रीय स्पर्धेत १५०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com