Agriculture news in Marathi The Shiv eatery in Pune district started from January 26 | Agrowon

पुणे जिल्ह्यात शिवभोजनालयाला २६ जानेवारीपासून सुरुवात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे ः सरकारने सत्तेवर येण्याअगोदर गरीब व गरजूंना फक्त दहा रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे ५०० ठिकाणी शिवभोजन योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सुरुवातील पुणे शहरात शिवभोजन केंद्र अकरा ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.

पुणे ः सरकारने सत्तेवर येण्याअगोदर गरीब व गरजूंना फक्त दहा रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे ५०० ठिकाणी शिवभोजन योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सुरुवातील पुणे शहरात शिवभोजन केंद्र अकरा ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अशा दोन ठिकाणी शिवभोजन सुरू होणार आहे. या दोन्ही शहरात मिळून एक हजार ५०० नागरिकांना अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळणार आहे. यासाठी नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली होती. हे जेवण दुपारी १२ ते २ या वेळेत नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी जागेचा शोध आणि कोणत्या संस्था पुढे येऊ शकतात.

याविषयीचा आढावा नुकताच पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला होता. शिवभोजनालय सुरू करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःची आवश्यक तेवढी जागा असणे आवश्यक आहे. योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळी, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी एका सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर या भोजनालयामध्ये एकाचवेळी किमान २५ लोक जेवण करण्यासाठी बसू शकतात, एवढी आसन क्षमता असणे आवश्यक आहे.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...