शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे नेतृत्व

शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे नेतृत्व
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे नेतृत्व

जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत सत्तेत भागीदार राहिलेली शिवसेना आता विरोधात आल्यानंतर भाजपमधील नाराज आणि दोन्ही कॉंग्रेसच्या सदस्यांचे नेतृत्व करून सत्ताधारी भाजपची कोंडी करीत आहे. जिल्हा परिषदेतील अस्थिरता विकासकामांवर परिणाम करीत आहे. दोन्ही पक्षांचे नेते मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची स्थिती आहे. 

जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक शिवसेना व भाजपची युती झाली. पहिल्या वेळेस दोन्ही पक्ष एकत्र लढले. नंतरच्या दोन पंचवार्षिक स्वतंत्र लढले, पण निवडणुकीनंतर एकत्र आले. या पंचवार्षिकमध्ये भाजप ३३ जागा मिळवून बहुमतापासून एक पाऊल मागे राहिला. पण सत्तेत शिवसेनेला वाटा नको म्हणून कॉंग्रेसची मदत घेऊन सत्ता स्थापन केली. कॉंग्रेसच्या सदस्याला आरोग्य समितीचे सभापतिपद भाजपने दिले. तेव्हापासून शिवसेना दुखावली असून, प्रत्येक मुद्यावर विरोध आणि वादंग मागील दीड वर्षापासून सुरू आहे. पॉलीमर बाक, भजनी मंडळांसाठी साहित्य खरेदी व इतर निविदा प्रक्रियेसंबंधी भाजपच्या नाराज सदस्यांची मदत घेऊन शिवसेनेने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी केली. या निविदा रखडल्या. भाजपमधील गटबाजीला प्रोत्साहन देण्याचा छुपा अजेंडाही शिवसेना वर्षभरापासून राबवित असून, नाराज सदस्यांसोबत मैत्रीही शिवसेनेच्या सदस्यांनी केली.

मागील तीन सर्वसाधारण सभांमध्ये भाजपच्या सदस्यांनाच सोबत घेऊन शिवसेनेने अनेक विषयांना खोडा घातला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या विशेष सभेतही दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेऊन शिवसेना सदस्यांनी निधीच्या असमान वाटपावरून सभात्याग केला. थेट मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. शिवसेनेचे सदस्य पवन सोनवणे, मनोहर पाटील, प्रताप पाटील, नाना महाजन व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी या वेळी धरणे धरून सत्ताधाऱ्यांवर दुजाभाव केल्याचा आरोप केला.

शिवसेना व भाजपमधील जिल्हा परिषदेतील वादंग थांबत नसल्याची स्थिती आहे. नेते जोपर्यंत दखल घेणार नाहीत व यावर तोडगा निघणार नाही तोपर्यंत हा वाद, असाच सभा, बैठका व नियोजनाच्या विषयांवरून पुढे येतच राहील, असा मुद्दा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चिला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com