शिवसेना खासदारांनी अर्थमंत्र्यांकडे मांडली पोल्ट्रीधारकांची व्यथा

poultry holders Distress Shiv Sena MPs present to Finance Minister
poultry holders Distress Shiv Sena MPs present to Finance Minister

नाशिक : कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १७) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. कोरोनाच्या संकटामुळे नुकसानीचा फटका सहन कराव्या लागलेल्या पोल्ट्रीधारकांना केंद्राने मदत करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. 

राज्यात होत असलेले पोल्ट्री व्यवसायाचे नुकसान लक्षात आणून दिले. कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात कोंबड्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने उत्पादित पोल्ट्रीधारकांकडून खरेदी मंदावली आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे उत्पादन खर्च करूनही दरात मोठा फटका सहन करावा लागत आहे; तर चिकनची दैनंदिन आहारातील मागणी कमी झाली. २००६ व २०१० या वर्षात बर्ड फ्लूपेक्षा ही स्थिती अत्यंत वाईट असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी शिवसेना पक्षाच्या संसदीय गटाचे नेते विनायक राऊत यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, अरविंद सावंत, राजेंद्र गावित व राहुल शेवाळे उपस्थित होते. 

कोरोनामुळे पोल्ट्रीधारकांची आर्थिक स्थिती गंभीर स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कुक्कुटपालकांना तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यायला हवा, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com