Agriculture news in Marathi, Shiv Sena should get a chance to work: Raju Shetty | Agrowon

शिवसेनेला काम करण्याची संधी मिळायला हवी ः राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सोलापूर : राज्यात बदलत्या समीकरणाबाबत स्वाभिमानीने काय भूमिका घ्यावी, यासाठी लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेणार आहे. पण भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे शिवसेनेला काम करण्याची संधी मिळायला पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. ७) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलले. या वेळी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमर कदम, जिल्हा संघटक विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष महमूद पटेल उपस्थित होते. 

सोलापूर : राज्यात बदलत्या समीकरणाबाबत स्वाभिमानीने काय भूमिका घ्यावी, यासाठी लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेणार आहे. पण भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे शिवसेनेला काम करण्याची संधी मिळायला पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. ७) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलले. या वेळी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमर कदम, जिल्हा संघटक विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष महमूद पटेल उपस्थित होते. 

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी मागील वर्षीचीच ‘एफआरपी’ कायम ठेवली आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’सोबतच त्यावर किती रुपये कारखानदारांकडून घ्यायचे? याचा निर्णय २३ नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेत घेतला जाणार आहे. यंदाच्या हंगामात सरासरी ऊस क्षेत्रात ५५ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. साखर कारखान्यांचा हंगाम यंदा ८० ते ८५ दिवस एवढाच चालेल, असा अंदाज आहे. कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळत नाही. दुष्काळानंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, शासन फक्त घोषणाच करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.’’

स्वाभिमानीचा प्रभाव ज्या भागात आहे, त्याच भागातील जागा लढण्याचा निर्णय स्वाभिमानीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घेतला होता. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीतून सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ स्वाभिमानीला मिळावा, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा फारसा उत्साह न दिसल्याने स्वाभिमानीने एकाही जागेची मागणी केली नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. पण स्वाभिमानीची ताकद आहे, ही ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दाखवू, असेही ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...