शिवसेनेचा ‘आव्वाज’ गावागावांत घुमणार; गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक

Shiv Sena's 'Awaj' will roam the villages
Shiv Sena's 'Awaj' will roam the villages

पुणे : भविष्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आपली पारंपरिक मोहीम ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ ही मोहीम अधिक जोमाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नव्या-जुन्या शिवसैनिकांची सांगड घालत ज्येष्ठांवर पक्षविस्ताराची जबाबदारी देण्यात येणार आहे.

८०च्या दशकात स्थापनेनंतर शिवसेनेने ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारासाठी ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक मोहीम युद्धपातळीवर राबवली होती. या मोहिमेद्वारे गावागावांत, नाक्यानाक्यांवर शाखांचा विस्तार करण्यात शिवसेना यशस्वी झाली होती. याबरोबरच प्रत्येक शाखेवर रुग्णवाहिकांची मोहीमदेखील राबविण्यात आली. मात्र, ती केवळ शहरी भागात रुजली. 

नव्याने पक्षविस्तारासाठी मोहीम राबविण्याची तयारी सुरू असून, नव्या-जुन्या शिवसैनिकांची सांगड घालत ज्येष्ठांवर पक्षविस्ताराची जबाबदारी देण्यात येणार आहे.

जबाबदारी देण्यात येणार असलेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, तानाजी सावंत या माजी मंत्र्यांसह विधानसभा निवडणुकीत धक्‍कादायक पराभव झालेले माजी मंत्री विजय शिवतारे, अर्जुन खोतकर यांच्यासह लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवाजीराव आढळराव, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ या खासदारांसह अनेक ज्येष्ठ; तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना पक्षविस्तारासाठी आव्हानात्मक जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचे शिवसेना नेत्यांच्या गोटातून सांगण्यात आले.

यापूर्वी ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ मोहीम राबविली होती. शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतून या मोहिमेमुळे शिवसेना खेड्यापाड्यांत पोचली. पुन्हा याच मोहिमेतून आम्ही राज्यभरातील गावागावांत, घराघरांत पोचून शिवसेना राज्यातील सर्वांत शक्तिशाली पक्ष बनवू. - माऊली खंडागळे, तालुकाप्रमुख, जुन्नर (जि. पुणे)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com