सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा अतिआत्मविश्‍वासाचा फुगा फुटला

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा अतिआत्मविश्‍वासाचा फुगा फुटला
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा अतिआत्मविश्‍वासाचा फुगा फुटला

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुख्यतः भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ही लढत रंगली. त्यात काँग्रेसने एका ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन ठिकाणी; तर भाजपने दोन जागांशिवाय दोन अतिरिक्त जागा मिळवत बऱ्यापैकी कामगिरी केली. तरीही ज्या तडफेने शिवसेनेने सहा जागा लढवल्या त्यात सांगोला वगळता करमाळा, बार्शी, सोलापूर मध्य, मोहोळ आणि माढा या पाच मतदारसंघांत आयात उमेदवारांना उमेदवारी देऊन अतिआत्मविश्‍वास दाखवला; पण मतदारांनी या दलबदलूंसह शिवसेनेचाही अतिआत्मविश्‍वासाचा फुगा फोडल्याचे दिसून आले.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती यांना सोलापूरमध्य मधून शेवटपर्यंत लढत द्यावी लागली. एकेकाळी त्यांचेच स्वकीय असणाऱ्यांनी त्यांना आव्हान दिल्याने परिस्थिती कठीण होती, पण त्यांनी बाजी मारली. पंढरपूर, मोहोळ आणि माढा या तीन जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी कामगिरी केली. भाजपने महायुतीच्या जागावाटपात अक्कलकोट आणि पंढरपूरच्या दोन जागा रयतक्रांती संघटनेला देत असल्याचे जाहीर करत इथे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली. पण फक्त अक्कलकोटला यश मिळवता आले. मोहिते पाटलांच्या बळावर माळशिरसही जिंकून घेतले. त्यामुळे पूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने भाजपकडे असलेले दोन संख्याबळ आता चार झाले. एकूणच जिल्ह्यात भाजपची कामगिरी चांगली झाली, पण महायुतीत शिवसेनेला अतिआत्मविश्‍वास नडल्याचे चित्र होते. 

शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांनी या सर्वाची जबाबदार घेत ऐनवेळी करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या रश्‍मी बागल, बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप सोपल, सोलापूरमध्य मध्ये काँग्रेसचे दिलीप माने, माढ्यात भाजपचे किरण कोकाटे आणि मोहोळमध्ये भाजपचेच नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेत प्रवेश दिले. तसेच या सर्व मतदारसंघांत बंडखोरांचे आव्हान असतानाही या आयात उमेदवारांना उमेदवारी दिली. पण सर्वजण मोठ्या मताच्या फरकाने पराभूत झाले. ऐनवेळी आयात केलेल्या या उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारले. सांगोल्यातही शिवसेनेचे शहाजी पाटील पोस्टलमधील ७६८ एवढ्या कमी मताधिक्‍याने निवडून आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com