agriculture news in marathi, shiv swarjya yatra starts, pune, maharashtra | Agrowon

फडणवीस सरकारने अधोगतीचा नवा इतिहास रचला ः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पुणे  ः शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मुख्यमंत्री आणि भाजप राज्यातील अधोगतीला जबाबदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन काही लोक सत्तेत आले पण जनतेला काहीच मिळाले नाही. अधोगतीचा नवा इतिहास फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत रचला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

पुणे  ः शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मुख्यमंत्री आणि भाजप राज्यातील अधोगतीला जबाबदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन काही लोक सत्तेत आले पण जनतेला काहीच मिळाले नाही. अधोगतीचा नवा इतिहास फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत रचला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ मंगळवारी (ता. ६) किल्ले शिवनेरी येथून झाला. या वेळी जुन्नर बाजार समिती आवारात आयोजित सभेत श्री. पाटील बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अजित पवार, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.  

या वेळी श्री. पाटील म्हणाले, की राज्याच्या डोक्यावरील कर्ज पाच लाख कोटींवर जाऊनदेखील विकास कुठेच दिसत नाही. कोणत्याही जिल्ह्यात नवी गुंतवणूक वा नवा रोजगार मिळाला का असे विचारले तर नकारात्मक उत्तरच मिळते. या सरकारमुळे राज्याची गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रात अधोगती झाली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, की ७२ हजार नोकऱ्यांसाठी मेगाभरती करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? ‘खोटं बोला पण रेटून बोला’ हा मुख्यमंत्र्यांचा उद्योग सुरू आहे. महाजनादेश यात्रा ही 'चालू' मुख्यमंत्र्यांची यात्रा आहे. मीच मुख्यमंत्री राहणार हे मिरवण्यासाठीची यात्रा आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठीची आहे. मात्र शिवस्वराज्य यात्रा हि जनतेच्या हितासाठी आहे.

अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्रात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. आपल्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मंत्री असताना राज्यात जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली, तेव्हा प्रचार सोडा; जनतेच्या मदतीला धावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. सरकारने ३७० कलम रद्दबातल करून ऐतिहासिक निर्णय घेतला. १८ पगड जातीचे लोक एकत्र राहावेत, देश एकसंघ राहावा म्हणून असे निर्णय घेणं गरजेचं आहे. आता पुढे खबरदारी बाळगून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या; देशभरातली जनता पाठीशी उभी राहील. यात राजकारण करू नये.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...