Agriculture news in Marathi The Shiva Memorial Tender is not Misconduct; Minister Chavan | Agrowon

शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही; मंत्री चव्हाण यांचा निर्वाळा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झालेला नाही, असा निर्वाळा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २५) विधानसभेत दिला; तसेच या प्रकल्पाचे महालेखाकारांकडून नियमित लेखापरीक्षण झाले असून, त्यांच्या काही मुद्यांबाबत कार्यपद्धतीनुसार निरीक्षणे नोंदवली असल्याचे चव्हाण यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झालेला नाही, असा निर्वाळा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २५) विधानसभेत दिला; तसेच या प्रकल्पाचे महालेखाकारांकडून नियमित लेखापरीक्षण झाले असून, त्यांच्या काही मुद्यांबाबत कार्यपद्धतीनुसार निरीक्षणे नोंदवली असल्याचे चव्हाण यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

याबाबत आमदार महेंद्र दळवी, माणिकराव कोकाटे, चंद्रकांत निंबा पाटील, प्रकाश फातर्पेकर, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, सुनील राऊत आदींनी तारांकित प्रश्न विचारला होता. उच्चस्तरीय सुकाणू समितीने निविदा, अटी व शर्थी यांच्या मर्यादेत; तसेच स्मारकाच्या एकूण २१० मीटर उंचीमध्ये बदल न करता प्रकल्पाची किंमत कमी करण्याच्यादृष्टीने एल अॅण्ड टी कंपनीसोबत वाटाघाटी करण्यास दिलेल्या निर्देशास अनुसरून प्रकल्पाची किंमत निश्चित करण्यात आली. त्यानुसार स्मारकाची उंची २१२ मीटर अंतिम करण्यात आली असून, भरावाचे क्षेत्रफळ किमान ६.८० हेक्टर करण्यात आले. किंमत निश्चित केल्यानंतर कंत्राटाची किंमत २ हजार ५८१ कोटी रुपये अधिक वस्तू आणि सेवाकर अशी निश्चित केली, असे चव्हाण यांनी उत्तरात नमूद केले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...