द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पवार

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी सोलापूर विभागाचे शिवाजीराव पवार तर उपाध्यक्षपदी नाशिक विभागाचे कैलास भोसले यांची निवड करण्यात आली.
Shivajirao Pawar as the President of Grape Growers Association
Shivajirao Pawar as the President of Grape Growers Association

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी सोलापूर विभागाचे शिवाजीराव पवार तर उपाध्यक्षपदी नाशिक विभागाचे कैलास भोसले यांची निवड करण्यात आली. पुणे येथे संघाच्या सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड जाहीर करण्यात आली. संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २६) पार पडली. यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.  

संघाच्या सर्वसाधारण सभेत गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जमाखर्च यांना मंजुरी देण्यात आली. येणाऱ्या काळात द्राक्ष बागायतदार संघाच्या सभासदांना सेवा पुरविण्याच्या अनुषंगाने अद्ययावत प्रयोगशाळा, त्यासाठी लागणारे आधुनिक उपकरणे व यांत्रिकीकरण या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. द्राक्ष उत्पादनात वाढता उत्पादन खर्च कमी करून औषधे, विद्राव्य खते यांची माफक दरात उपलब्धता करून देणे व मिळणाऱ्या नफ्यातून संघाचा कारभार चालवणे हे आगामी काळात नियोजन असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पवार यांनी सांगितले.

द्राक्ष बागायतदार संघाच्या कामकाजात मोठी परंपरा आहे. जुन्या पिढीच्या संघातील पदाधिकाऱ्यांनी प्रयोगशीलतेच्या माध्यमातून कामकाज उभे केले. त्यामुळे येणाऱ्या काळात द्राक्ष उत्पादन किमान खर्चात कसे होईल यासाठी व्यापक प्रचार प्रसिद्धी केली जाईल. सिंचन व्यवस्थापनासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान देण्यास भर असेल. यासह राज्यात विभागनिहाय द्राक्ष हंगामाचे नियोजन वेगवेगळे असल्याने विभागनिहाय शिवार फेऱ्यांचे आयोजन करून त्यामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात येईल. द्राक्ष बागायतदार समृद्ध होईल यावर आमचा भर असल्याचे पवार यांनी नमूद केले

कार्यकारिणी अशी : शिवाजीराव पवार (अध्यक्ष), कैलास भोसले (उपाध्यक्ष), सुनील पवार (कोषाध्यक्ष), चंद्रकांत लांडगे (अध्यक्ष-मध्यवर्ती विज्ञान समिती) 

संचालक : रामभाऊ धावणे, अरविंद ननावरे, दत्तात्रय ढिकेकर, अभिषेक कांचन, चनिगोंडा हविनाळे, दत्तकुमार साखरे, महादेव वडणे, लालासाहेब गव्हाणे, सकलेश लिगाडे, राजेंद्र देशमुख, शंकर येणगुरे, लालासाहेब देशमुख, शिवलिंग शंख, विनायक पाटील, हनमंत चव्हाण, सुरेश एकुंडे, किशोर बाबर, अनिकेत धुळी, अमोल माळी, दिलीप कुलकर्णी, भारत सोनवणे, पुरुषोत्तम बोरस्ते, रावसाहेब रायते, विलास शिंदे, रवींद्र बोराडे, सुरेश कळमकर, बबनराव भालेराव, शामराव शिरसाठ, किशोर निफाडे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com