कोल्हापुरातील शिवारे जलमय

जिल्ह्याला बुधवारी (ता. १६) रात्रीपासून मॉन्सून सरींनी झोडपून काढले. रात्रभर झालेल्या संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली. अनेक शिवारे जलमय झाल्याचे चित्र शिवारात होते.
Shivare in Kolhapur is waterlogged
Shivare in Kolhapur is waterlogged

कोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६) रात्रीपासून मॉन्सून सरींनी झोडपून काढले. रात्रभर झालेल्या संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली. अनेक शिवारे जलमय झाल्याचे चित्र शिवारात होते. गुरुवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा येथे २४९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. प्रत्येक तालुक्यातील ८० टक्के मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.  

सर्वत्र झालेल्या पावसामुळे ४८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यांची पातळी तब्बल बारा फुटांनी वाढली आहे. बुधवारी (ता. १६ ) सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यांची पाणीपातळी १३ फूट होती. गुरुवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजता राजाराम बंधाऱ्यांची पाणीपातळी २५ फूट चार इंचांपर्यंत वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत राजाराम बंधारा येथील पाणीपातळी तब्बल बारा फुटांनी वाढली. राजाराम बंधारा पाण्याखाली आहे.

मंगळवारी पावसाचे दमदार आगमन झाले. जिल्ह्याच्या सर्वंच भागांत पावसाचा जोर असल्यामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. रात्रभर पावसाचा तडाखा जोरात असल्याने उसासह भाजीपाला व नव्याने पेरणी केलेल्या शिवारामध्ये ही पाणी साचून राहिले. यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे विशेष करून या पावसाने भाजीपाला काढणी मोठा व्यत्यय आणला.

१०० मिलिमीटरपेक्षा पावसाची ठिकाणे रुई १०६.५, पन्हाळा ११०, कळे १२९, पडळ १०६, बाजारभोगाव १३९, कोतोली १३५, भेडसगाव १३९, बांबवडे ११२, करंजफेन १२३, सरूड ११५, मलकापूर १३८, आंबा १३४, राधानगरी १२२, सरवडे १२३, कसबा तारळे १२३, आवळी बुद्रुक ११२, राशिवडे बुद्रुक १२९, कसबा वाळवे १३०, गगनबावडा २४९, साळवण ११५, बीड १३६, हळदी १५४, इसपूरली १०९, कागल १०८, सिद्धीनेर्ली ११०, केनवडे १०७  खडकेवाड११३, मुरगुड १४०, बिद्री १२०, डुंडगे १०५, महागाव ११२, नेसरी १०८, कुर १५०, मलिग्रे ११९, चंदगड १३०, नरगवाडी १२५, तुरकेवाडी ११२, हेरे १४८.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com