Agriculture news in Marathi Shivare in Kolhapur is waterlogged | Agrowon

कोल्हापुरातील शिवारे जलमय

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

जिल्ह्याला बुधवारी (ता. १६) रात्रीपासून मॉन्सून सरींनी झोडपून काढले. रात्रभर झालेल्या संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली. अनेक शिवारे जलमय झाल्याचे चित्र शिवारात होते.

कोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६) रात्रीपासून मॉन्सून सरींनी झोडपून काढले. रात्रभर झालेल्या संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली. अनेक शिवारे जलमय झाल्याचे चित्र शिवारात होते. गुरुवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा येथे २४९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. प्रत्येक तालुक्यातील ८० टक्के मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.  

सर्वत्र झालेल्या पावसामुळे ४८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यांची पातळी तब्बल बारा फुटांनी वाढली आहे. बुधवारी (ता. १६ ) सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यांची पाणीपातळी १३ फूट होती. गुरुवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजता राजाराम बंधाऱ्यांची पाणीपातळी २५ फूट चार इंचांपर्यंत वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत राजाराम बंधारा येथील पाणीपातळी तब्बल बारा फुटांनी वाढली. राजाराम बंधारा पाण्याखाली आहे.

मंगळवारी पावसाचे दमदार आगमन झाले. जिल्ह्याच्या सर्वंच भागांत पावसाचा जोर असल्यामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. रात्रभर पावसाचा तडाखा जोरात असल्याने उसासह भाजीपाला व नव्याने पेरणी केलेल्या शिवारामध्ये ही पाणी साचून राहिले. यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे विशेष करून या पावसाने भाजीपाला काढणी मोठा व्यत्यय आणला.

१०० मिलिमीटरपेक्षा पावसाची ठिकाणे
रुई १०६.५, पन्हाळा ११०, कळे १२९, पडळ १०६, बाजारभोगाव १३९, कोतोली १३५, भेडसगाव १३९, बांबवडे ११२, करंजफेन १२३, सरूड ११५, मलकापूर १३८, आंबा १३४, राधानगरी १२२, सरवडे १२३, कसबा तारळे १२३, आवळी बुद्रुक ११२, राशिवडे बुद्रुक १२९, कसबा वाळवे १३०, गगनबावडा २४९, साळवण ११५, बीड १३६, हळदी १५४, इसपूरली १०९, कागल १०८, सिद्धीनेर्ली ११०, केनवडे १०७  खडकेवाड११३, मुरगुड १४०, बिद्री १२०, डुंडगे १०५, महागाव ११२, नेसरी १०८, कुर १५०, मलिग्रे ११९, चंदगड १३०, नरगवाडी १२५, तुरकेवाडी ११२, हेरे १४८. 
 


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...