Agriculture news in Marathi Shivbhun plate menu fixed | Agrowon

शिवभोजन थाळीतील मेनू निश्चित

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 मार्च 2020

नगर ः शहरातील मंजूर केलेल्या शिवभोजन केंद्रांवर वारंवार तपासणी केली असता, गरजूंना वांगी, बटाटा भाजीशिवाय थाळी दिली जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. गरिबांना सर्व पौष्टिक भाज्यांचा आस्वाद घेता यावा, यासाठी केंद्रचालकांना आठ दिवसांच्या जाहीर केलेल्या मेन्यूप्रमाणेच शिवभोजन थाळीत भाजी देण्याचे आदेश जारी केले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून संगण्यात आले. 

नगर ः शहरातील मंजूर केलेल्या शिवभोजन केंद्रांवर वारंवार तपासणी केली असता, गरजूंना वांगी, बटाटा भाजीशिवाय थाळी दिली जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. गरिबांना सर्व पौष्टिक भाज्यांचा आस्वाद घेता यावा, यासाठी केंद्रचालकांना आठ दिवसांच्या जाहीर केलेल्या मेन्यूप्रमाणेच शिवभोजन थाळीत भाजी देण्याचे आदेश जारी केले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून संगण्यात आले. 

सामान्य, गरिब नागरिकांना जेवण मिळावे यासाठी, यासाठी सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. २६ जानेवारीला योजनेस प्रत्यक्ष प्रारंभ झाला. नगर शहरात पाच केंद्रांत सातशे थाळ्यांना मंजुरी दिली. त्यानंतर नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी पाच केंद्रांना मंजुरी दिली. सध्या शहरातील महत्त्वाच्या शिवभोजन दहा केंद्रांतून चौदाशे थाळ्या दिल्या जात आहेत. आता शिवभोजन केंद्रांतून दिल्या जाणाऱ्या भोजनातील दैनंदिन भाज्यांचा मेन्यू निश्‍चित करण्यात आला. त्यानुसार शिवभोजनाच्या लाभार्थींना दिल्या जाणाऱ्या थाळ्यात कोणत्या दिवशी कोणता मेनू असावे हे निश्चित करण्यात आले आहे. थाळ्यात आता कडधान्य, वेलवर्गीय व पालेभाज्यांचा आस्वाद घेता येणार आहे. मागील पावणेदोन महिन्यांपासून सुरू असलेल्या योजनेत नगर जिल्ह्याने सुरवातीपासूनच आघाडी घेतली आहे. केंद्रचालकांना आठ दिवसांच्या जाहीर केलेल्या मेन्यूप्रमाणेच शिवभोजन थाळीत भाजी देण्याचे आदेश जारी केले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून संगण्यात आले. 

सीसीटीव्हीचा ‘वॉच’ 
केंद्रचालकांना आठवड्याचा मेन्यू दिला आहे. त्याचपद्धतीने वाराप्रमाणे भाजी द्यावी लागणार आहे. नेमून दिलेल्या आठवड्याच्या भाजीपाल्याचे सूचना फलक लावणे बंधनकारक असून, सीसीटीव्ही बसविण्याचेही निर्देश देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे.

असा राहील मेन्यू 
सोमवार ः मेथी, शेपू, पालक, करडई 
मंगळवार ः भोपळा, दोडकी, घोसाळी, पडवळ 
बुधवार ः मोडाची मटकी, चवळी, हरभरा, मूग, वाटाणा 
गुरुवार ः कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, भेंडी, बटाटा 
शुक्रवार ः मेथी, शेपू, पालक, करडई 
शनिवार ः शेवगा, वाल, घेवडा, गवार 
रविवार ः मोडाची मटकी, चवळी, हरभरा, मूग, वाटाणा


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...