agriculture news in Marathi shivneri pattern of rural tourism development Maharashtra | Agrowon

ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी संवर्धन पॅटर्न’

गणेश कोरे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

माझी दीड एकर शेती असून, भाऊ शेती करत असल्याने मी किल्ल्यावर २२-२३ वर्षांपासून सरबत, ताक, लस्सी विक्री करत आहे. गेल्या १०-१२ वर्षांत किल्ल्यावर सहलींबरोबरच, पर्यटकांची संख्या वाढल्याने चांगला व्यवसाय होतो. मला रोज सुमारे दीड दोन हजार रुपये मिळतात. 
- अरविंद दुराफे, सरबत विक्रेता

पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीचा शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्प आदर्श पॅटर्न ठरला आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार शिवनेरी किल्‍ल्याला भेट देणाऱ्या सहली, पर्यटक, शिवभक्त आणि अभ्यासकांची संख्या वर्षाला सुमारे ५ लाख एवढी आहे. याद्वारे किल्ल्यावर सरबत, ताक, लस्सी आणि इतर किरकोळ व्यवसायाद्वारे दरवर्षी सुमारे पाच कोटींची उलाढाल होत आहे. या रोजगार संधीतून कुसूर गावातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा शाश्‍वत पर्याय उपलब्ध झाला 
आहे. 

शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पाची सुरुवात २००३ रोजी झाली. जुन्नर वनविभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक अशोककुमार खडसे, जिल्हाधिकारी मधुकर कोकाटे यांच्या प्रयत्नातून विविध विभागांच्या समन्वयातून ८६ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. टप्प्याटप्प्याने वन विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभागाच्या वतीने संवर्धन आणि विकासाची विविध कामे किल्ल्यावर करण्यात आली. यासाठी आत्तापर्यंत सुमारे ७० कोटी रुपये निधी खर्च झाला आहे.  

किल्ल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पामुळे किल्ल्याला भेट देणाऱ्या सहली, पर्यटक, शिवभक्त,अभ्यासकांची संख्या देखील वाढली आहे. वनविभागाच्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे ५ लाख पर्यटक भेट देत आहे. एका पर्यटकाकडून किल्ल्‍यावर सरबत, ताक, लस्सी सह इतर किरकोळ खरेदीसाठी किमान शंभर रुपये खर्च केला जातो. या माध्यमातून सुमारे ५ कोटींची उलाढाल होत असून,  कुसूर गावातील शेतकऱ्यांना रोजगाराचा शाश्‍वत पर्याय उपलब्ध झाला आहे. 

स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा
पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे कर्जत - जामखेड एकात्मिक संस्था उद्‌घाटन कार्यक्रमात म्हणाले होते, की परदेशात फिरत असताना एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी होणारा विकास आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा फायदा अनेकदा ठळकपणे समोर आलेला पाहिला. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे अनेक किल्ले, मंदिरे, अभयारण्ये, नैसर्गिक गोष्टी आहेत त्यामुळे आता पर्यटनाकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहिले गेले पाहिजे.

तर छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही
‘‘आपण सातत्याने गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत बोलत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गड किल्ले बांधले. आपले ऐतिहासिक असलेले गड किल्ले जगासमोर पुन्हा दिमाखाने दाखवू शकलो नाही तर छत्रपतींचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही,’’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बालमोहन शाळेतील सत्कार सोहळ्यात म्हणाले होते.  

प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थसंकल्पात संस्कृती आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी हरयाणा, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, तामिळनाडू या पाच राज्यांतील पुरातत्त्व स्थळांचा विकासाला मंजुरी देण्यात आली. मात्र, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनासाठी एकाही स्थळाचा समावेश करण्यात आलेला नाही. केंद्राने जाणीवपूर्वक केलेली ही चूक महाराष्ट्र सरकारने सुधारावी. राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून राज्याच्या प्रादेशिक समतोल साधत विविध किल्ल्यांच्या (सागरी,  डोंगरी, भुईकोट, वनदुर्ग) समांतर विकास प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी. शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीमधील वारसा संग्रहालयाच्या मंजुरीची घोषणा शिवजयंतीला करत, तरतूद अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी.
- जितेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष, सह्याद्री गिरीभ्रमण संस्था, जुन्नर (पुणे)


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...