Agriculture news in marathi, Shivpremi's protests against the decision to rent to fort | Agrowon

गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाविरोधात शिवप्रेमींची निदर्शने
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

बुलडाणा : राज्यातील २५ गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याच्या शासनाच्या कथित निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शिवप्रेमींनी सोमवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. शासनाने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असून, तो तत्काळ मागे घेण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बुलडाणा : राज्यातील २५ गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याच्या शासनाच्या कथित निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शिवप्रेमींनी सोमवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. शासनाने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असून, तो तत्काळ मागे घेण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की ज्या किल्ल्यांसाठी मावळ्यांनी रक्त सांडले, ते शौर्याचे प्रतीक असणारे किल्ले भाड्याने देणे योग्य नाही. शिवप्रेमी, शिवरायांच्या विचारावरती व शिवरायांवरती प्रेम करणारी माणसे आहोत. गडकोट आणि किल्ले आमच्यासाठी दैवत व तीर्थच आहे. तेथील दगड अन् दगड ही इतिहासाची साक्ष देतात. परंतु महाराष्ट्र सरकारने ३ सप्टेंबर रोजी कॅबिनेट मंत्री मंडळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ल्यांना हॉटेल, लग्न समारंभ इत्यादींकरिता भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय पारीत करण्यात आला आहे. तो त्वरित मागे घ्यावा.

दरम्यान, राज्यातील गडकोट, किल्ले आदींच्या संवर्धनासाठी शासनाच्या वार्षिक आर्थिक बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात यावी. तरतुदीनुसार खर्च व कामांचा आढावा जनतेसमोर मांडावा. बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तूंचे जतन व संवर्धनासाठी तरतूद करण्यात यावी. शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील शिवप्रेमींची माफी मागावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी सागर काळवाघे, प्रा. अमोल वानखेडे, माजी आमदार विजयराज शिंदे, संजय गायकवाड, अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, डॉ. गायत्री सावजी, डी. आर. माळी, कुणाल पैठणकर, दत्ता काकस आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...