agriculture news in marathi, shivsena agitate on gram-tur issue in akola district | Agrowon

हरभरा-तूर खरेदी प्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018

अकोला : जिल्ह्यात तूर खरेदी बंद असून हरभरा खरेदीसुद्धा जोमाने सुरू नाही. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (ता. १८) साडेचारशेपेक्षा अधिक शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात अांदोलन केले. अाक्रमक शिवसैनिकांनी मार्केटिंग अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर अाणून हरभरा, तूर वाहिली.

अकोला : जिल्ह्यात तूर खरेदी बंद असून हरभरा खरेदीसुद्धा जोमाने सुरू नाही. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (ता. १८) साडेचारशेपेक्षा अधिक शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात अांदोलन केले. अाक्रमक शिवसैनिकांनी मार्केटिंग अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर अाणून हरभरा, तूर वाहिली.

राज्यात १५ मेपासून तूरखरेदी थांबलेली अाहे. जिल्ह्यात लाखो क्विटंल तूर शेतकऱ्यांकडे पडून अाहे. ज्यांनी विक्री केली त्यांना चुकारेही मिळालेले नाहीत. हरभरा खरेदी अत्यंत संथगतीने सुरू असून, लवकरच या खरेदीचीही मुदत संपत अाहे. या दोन्ही मुद्यांवर जाब विचारण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. टेबल खुर्चीवर तूर-हरभरा फेकण्यात अाला. अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून प्रतिकात्मक तूर वाहण्यात आली. या वेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शासकीय धोरणांचा निषेध केला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या वेळी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 

इतर ताज्या घडामोडी
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...