शिवसेनेकडून ७० जणांना उमेदवारी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसेनेनेही मंगळवारी आपले ७० उमेदवार जाहीर केले. आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाले. नालासोपाऱ्यातून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना तिकीट मिळाले. 

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाचा तिढा सुटला आहे. खात्रीशीर सूत्रांनुसार भाजपला १६४ आणि शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा देण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा ५०-५० चा फॉर्म्युला भाजपने फेटाळून आपल्या पद्धतीने जागावाटप केल्याचे दिसते आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेच्या दोन जागा देण्यात येणार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागी विजय मिळवला होता. शिवसेनेने बंडखोरी टाळण्यासाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली नव्हती. त्यांनी आपल्या पदरात पडलेल्या १२४ मतदारसंघांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

असे आहेत शिवसेना उमेदवार : नांदेड उत्तर  - राजश्री पाटील, मुरुड  - महेंद्रशेठ दळवी, हडगाव  - नागेश अष्टीकर, मुंबादेवी  - पांडुरंग सकपाळ, भायखळा - यामिनी जाधव, गोवंडी  - विठ्ठल लोकरे, एरंडोल/पारोळा  - चिमणराव पाटील, वडनेरा  - प्रीती संजय, श्रीवर्धन- विनोद घोसाळकर, कोपरी पाचखापडी  - एकनाथ शिंदे, विजापूर  - रमेश बोरनावे, शिरोळ  - उल्हास पाटील, गंगाखेड  - विशाल कदम, दापोली  - योगेश कदम, गुहागर  - भास्कर जाधव, अंधेरी पूर्व  - रमेश लटके, कुडाळ  - वैभव नाईक, ओवळा माजिवडे  - प्रताप सरनाईक, बीड - जयदत्त क्षीरसागर, पैठण  - संदीपान भुमरे, शहापूर  - पांडुरंग बरोरा, नगर शहर  - अनिल राठोड, सिल्लोड  - अब्दुल सत्तार, औरंगाबाद (दक्षिण)  - संजय शिरसाठ, अक्क्लकुवा  - अमेशा पडवी, इगतपुरी- निर्मला गावित, वसई  - विजय पाटील, नालासोपारा  - प्रदीप शर्मा, सांगोला  - शहाजी बापू पाटील, कर्जत  - महेंद्र थोरवे. घनसावंगी  - हिकमत उढाण, खानापूर  - अनिल बाबर, राजापूर  - राजन साळवी, बाळापूर  - नितीन देशमुख, जळगाव ग्रामीण  - गुलाबराव पाटील, पाचोरा  - किशोर पाटील, मेहकर  - डॉ. संजय रायमुलकर, दिग्रस  - संजय राठोड, देगलूर  - सुभाष साबणे, कळमनुरी  - संतोष बांगर, परभणी  - डॉ. राहुल पाटील, जालना  - अर्जुन खोतकर, औरंगाबाद पश्चिम  - संजय शिरसाट, नांदगाव  - सुहास कांदे, मालेगाव बाह्य  - दादा भुसे, येवला  - संभाजी पवार, सिन्नर  - राजाभाऊ वाझे, निफाड  - अनिल कदम, देवळाली  - योगेश घोलप, मागाठणे  -प्रकाश सुर्वे, विक्रोळी  - सुनील राऊत, जोगेश्वरी पूर्व  - रवींद्र वायकर, दिंडोशी  - सुनील प्रभू, मानखुर्द शिवाजीनगर  - विठ्ठल लोकरे, अणुशक्तीनगर  - तुकाराम काते, चेंबूर  - प्रकाश फातर्फेकर, कुर्ला  - मंगेश कुडाळकर, कालिना - संजय पोतनीस, माहिम  - सदा सरवणकर, वरळी  - आदित्य ठाकरे, शिवडी  - अजय चौधरी, पुरंदर  - विजय शिवतारे, खेड आळंदी  - सुरेश गोरे, पिंपरी  - गौतम चाबुकस्वार, उमरगा  - ज्ञानराज चौगुले, चंदगड  - संग्राम कुपेकर, राधानगरी  - प्रकाश आबिटकर, कोल्हापूर उत्तर  - राजेश क्षीरसागर, हातकणंगले  - सुजित मिणचेकर,करवीर  -चंद्रदीप नरके.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com