शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा, युतीचे ३७ उमेदवार आत्तापर्यंत जाहीर

शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा, युतीचे ३७ उमेदवार आत्तापर्यंत जाहीर

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, रायगडमधून अनंत गिते, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, अमरावतीमधून आनंदराव अडसूळ  यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेनेही उमेदवार यादी जारी केली. यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 21 जणांचा उमेदवारी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातून लोकसभा उमेदवारी मिळालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावे :

1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत 2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे 3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर 4) ठाणे- राजन विचारे 5) कल्याण- श्रीकांत शिंदे 6) कोल्हापूर- संजय मंडलिक 7) हातकणंगले- धैर्यशील माने 8) नाशिक- हेमंत गोडसे 9) शिर्डी- सदाशिव लोखंडे 10) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील 11) संभाजीनगर - चंद्रकांत खैरे 12) बुलढाणा- प्रतापराव जाधव 13) रामटेक- कृपाल तुमाणे 14) अमरावती- आनंदराव अडसूळ 15) परभणी- संजय जाधव 16) मावळ- श्रीरंग बारणे 17) धाराशिव  – ओमराजे निंबाळकर 18) हिंगोली - हेमंत पाटील  19) यवतमाळ - भावना गवळी  20) रायगढ़ - अनंत गीते  21) सिंधुदुर्ग रत्नागिरी - विनायक राऊत

महाराष्ट्रातून लोकसभा उमेदवारी मिळालेल्या भाजपच्या उमेदवारांची यादी :

1) नंदूरबार - डॉ. हिना गावीत 2) धुळे - डॉ. सुभाष भामरे 3) रावेर - रक्षा खडसे 4) नागपूर - नितीन गडकरी 5) वर्धा - रामदास तडस 6) गडचिरोली - अशोक नेते 7) अकोला - संजय धोत्रे 8) चंद्रपूर - हंसराज अहिर 9) भिवंडी - कपिल पाटील 10) जालना - रावसाहेब दानवे 11) उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी 12) उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन  13) नगर - सुजय विखे पाटील 14) बीड - प्रीतम मुंडे 15) लातूर - सुधाकरराव श्रृंगारे 16) सांगली - संजय पाटील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com