agriculture news in marathi ShivSena delegation to visit Lakhimpur | Page 3 ||| Agrowon

शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार; राहुल गांधी-संजय राऊत यांची भेट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता.६) कॉंग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेने लखीमपूर खेरी येथे शिष्टमंडळ पाठविण्याची तयारी केली असल्याचे समजते. 

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींची उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली अटक यावरून शिवसेनेने कॉंग्रेसची पाठराखण करताना विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता.६) कॉंग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेने लखीमपूर खेरी येथे शिष्टमंडळ पाठविण्याची तयारी केली असल्याचे समजते. 

लखिमपूर खेरीच्या घटनेनंतर सर्व विरोधी पक्ष सत्ताधारी भाजप विरोधात विशेषत: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. या घटनेत आठ जणांचा बळी गेल्यानंतर तेथे निघालेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींना राज्य पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दुपारी राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर खासदार राऊत यांनी चर्चेचा तपशील देण्याचे टाळले. मात्र यामध्ये लखीमपूर खेरीचे प्रकरण, तसेच देश आणि राज्यातील राजकीय मुद्द्यांवर बोलणी झाल्याचे समजते. तत्पूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करून, अशी भेट होणार असल्याचे जाहीर करताना लखीमपूर खेरीची घटना संपूर्ण देशाला हादरविणारी असल्याची टिप्पणी केली. प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली असून विरोधी पक्षांच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून अडविले जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारच्या दडपशाहीविरुद्ध विरोधी पक्षांनी एकजूट होऊन पावले उचलण्याची गरज आहे, असे ट्विट राऊत यांनी केले. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...