Agriculture news in Marathi, Shivsena is not the party that matters to the election: Aditya Thackeray | Agrowon

शिवसेना निवडणुकीला महत्त्व देणारा पक्ष नाही ः आदित्य ठाकरे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

नगर : ‘‘जनआशीर्वाद यात्रेत जनतेचे आशीर्वाद व प्रेम मिळते आहे. पाऊस सुरू असतानाही तुम्ही थांबला, हे वलय, हे आशीर्वाद केवळ शिवसैनिकांच्या कामामुळे आहे. मला काहीही नको, जनतेशी संवाद साधण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. निवडणुकीसाठी किंवा मुख्यमंत्रिपदासाठी ही यात्रा नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, की जो निवडणुकांना महत्त्व देत नाही. पुढचे सरकार शिवशाहीचे असेल,’’ असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले.

नगर : ‘‘जनआशीर्वाद यात्रेत जनतेचे आशीर्वाद व प्रेम मिळते आहे. पाऊस सुरू असतानाही तुम्ही थांबला, हे वलय, हे आशीर्वाद केवळ शिवसैनिकांच्या कामामुळे आहे. मला काहीही नको, जनतेशी संवाद साधण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. निवडणुकीसाठी किंवा मुख्यमंत्रिपदासाठी ही यात्रा नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, की जो निवडणुकांना महत्त्व देत नाही. पुढचे सरकार शिवशाहीचे असेल,’’ असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले.

जनआशीर्वाद संवाद यात्रेनिमित्त ढोकी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, की जो निवडणुकांना महत्त्व देत नाही. सत्ता असो वा नसो; जनतेची कामे करीत राहणार. शिवसेना-भाजप युती झाली, तेव्हा पहिली अट शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी होती. शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी शहरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले. आता विमा कंपन्या खडबडून जाग्या झाल्या. आता निधी वर्ग होत आहे.’’

भाजपमध्ये काही चांगली मंडळीही : औटी
आदित्य ठाकरे यांच्या या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार असल्याची घोषणा पारनेर तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे यांनी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचा एकही पदाधिकारी ठाकरे यांच्या कार्यक्रमाकडे फिरकणार नाही, असे वातावरण तयार करण्यात आले होते. तथापि, पारनेर तालुका भाजप महिला आघाडीच्या प्रमुख अश्विनी थोरात यांनी समर्थकांसह कार्यक्रमास हजेरी लावली. औटी यांनीही त्यांचे स्वागत करीत, ‘‘सर्व भाजप सारखी नाही, काही चांगली मंडळीही त्या पक्षात आहेत. कसला बहिष्कार अन्‌ कसलं काय,’’ असे म्हणत थोरात यांचा, ‘‘ताई, तुम्ही या, बसा!’’ अशा शब्दांत आदरपूर्वक सन्मान केला. भाजपच्या बहिष्काराची पार्श्‍वभूमी माहीत झाल्याने खुद्द आदित्य ठाकरे यांनीही थोरात यांना अदबीने नमस्कार केला.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...